प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील
By Admin | Updated: September 25, 2015 00:32 IST2015-09-25T00:32:43+5:302015-09-25T00:32:43+5:30
शासनाच्या लोकोपयोगी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम झाले पाहिजे.

प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्नशील
सहकार्याची गरज : मोकाशी यांचे प्रतिपादन
साकोली : शासनाच्या लोकोपयोगी विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहचविण्याचे काम झाले पाहिजे. या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी शासकीय अधिकारी व कर्मचारी हे एक माध्यम आहे व हे माध्यम जर खंबरी असला तर योजनांचा लाभ नक्कीच लाभार्थ्यांना मिळेल. यासाठी प्रशासनात पारदर्शकता आवश्यक आहे, असे मत पंचायत समिती साकोली येथे नव्याने रूजु झालेल्या खंडविकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
डॉ. मोकाशी या वर्धा येथे सहायक प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत होत्या. तिथून त्यांचे स्थानांतरण साकोली येथे झाले. त्यांनी कालच साकोली पंचायत समितीचा पदभार सांभाळला असून पंचायत समिती व तालुक्याची इत्तभुत माहिती घेतली. त्या म्हणाल्या की, प्रशासनात काम करतानी प्रामाणिकपणा व कायद्याचे बंधन आवश्यक असून लोकांची कामे वेळेवर होणे आवश्यक आहे.
यासाठी कर्मचाऱ्यांनी कार्यालयात वेळेवर उपस्थित होणे, मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. जे कर्मचारी मुख्यालयी राहत नाही त्यांचेवर कार्यवाही करू व प्रशासनात पारदर्शकता आणून लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करू, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. (तालुका प्रतिनिधी)