मूलभूत गरजा जाणून समस्या दूर करण्याचे प्रयत्न
By Admin | Updated: October 24, 2016 00:46 IST2016-10-24T00:46:02+5:302016-10-24T00:46:02+5:30
सन २००४ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आम्ही गणेश नगर परिसरातील रस्त्यांचे बांधकाम केले.

मूलभूत गरजा जाणून समस्या दूर करण्याचे प्रयत्न
गोपालदास अग्रवाल : ८० लाखांच्या रस्ता बांधकामाचे भूमिपूजन
गोंदिया : सन २००४ च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर आम्ही गणेश नगर परिसरातील रस्त्यांचे बांधकाम केले. आज पुन्हा वेळेच्या मागणीनुसार आम्ही ज्या रस्त्यांचे भूमिपूजन करीत आहोत. त्यांच्या बांधकामानंतर परिसरातील वाहतूकीची समस्या सुटणार आहे. शहरातील मुलभूत गरजा जाणून समस्या दूर करण्याचे प्रयत्न आम्ही करीत असल्याचे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले.
शहरातील गणेशनगर परिसरातील सुबोध चौक, रामभरोसे लोहा दुकान, बी.जे.हॉस्पीटल या ८० लाख रूपयांच्या रस्ता डांबरी व सिमेंटीकरण बांधकामाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष दामोदर अग्रवाल होते. प्रामुख्याने नगर परिषद सभापती शिला इटानकर, प्रदेश प्रतिनिधी पृथ्वीपालसिंह गुलाटी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष के.आर. शेंडे, शहर अध्यक्ष अशोक चौधरी, रामदेव वर्मा, छैलबिहारी अग्रवाल, शरद इटानकर, किर्ती गुप्ता, अरूण अग्रवाल, सुंदर सोनवाने, डॉ. तेजराम येडे, विनोद मोर, राजेंद्र अग्रवाल, रामअवतार अग्रवाल, मुन्ना चंदेल, गोपाल तावाडे, सुंदर पटले व अन्य उपस्थित होते. संचालन शहर महासचिव अपूर्व अग्रवाल यांनी केले. प्रास्तावीक नगर परिषद सभापती इटानकर यांनी मांडले. (शहर प्रतिनिधी)