राहुटी आंदोलन सुरूच

By Admin | Updated: August 12, 2015 00:18 IST2015-08-12T00:18:12+5:302015-08-12T00:18:12+5:30

वंशपारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मेंढपाळ धनगरांना वनहक्क चराईसाठी पास द्यावेत अन्यथा नक्षलवादी बनण्याची ...

The troupe movement continues | राहुटी आंदोलन सुरूच

राहुटी आंदोलन सुरूच

जिल्हा कचेरीसमोर दुसरा दिवस : मेंढपाळ धनगर विकास मंच सोबत चर्चेची तयारी
अमरावती : वंशपारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मेंढपाळ धनगरांना वनहक्क चराईसाठी पास द्यावेत अन्यथा नक्षलवादी बनण्याची परवानगी द्यावी या प्रमुख मागणीसाठी सोमवार १० आॅगस्टपासून सुरू झालेले राहुटी आंदोलन मंगळवारी दुसऱ्या दिवशीही रात्री उशिरापर्यंत सुरूच होते. दरम्यान विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचचे पदाधिकारी यांच्यासोबत मंत्रालय स्तरावरून वनमंत्री व प्रधान सचिव यांच्याशी व्हिसीव्दारे चर्चा करण्याची तयारी सुरू होती.
विदर्भातील वनविभागाच्या परिक्षेत्रात वंश पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या मेंढपाळ धनगरांना राखीव चराई क्षेत्र देऊन चराई पासेस व चूल पासेस देण्यात यावीत, कुठलेही, वनपरीक्षेत्रात प्रकल्प होत असल्यास त्या ठिकाणच्या मेंढपाळ धनगरांची पर्यायी व्यवस्था (पुनर्वसन) करण्यात यावे, वनविभागाकडून मेंढ्यांचा हर्रास करणे बंद करण्यात यावे आदी मागण्या घेऊन विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचने जिल्हाअधिकारी कार्यालयाच्या मुख्य मार्गावर राहुट्या टाकून या ठिकाणी मागण्यांच्या पूर्ततेसाठी आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी सांयकाळी उशिरापर्यंत सदर राहुटी आंदोलन सुरूच असल्याने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाला नव्हता.
मंत्रालय स्तरावर तोडगा काढण्यासाठी दिवसभर हालचाली सुरू होती. परंतु सांयकाळी उशिरापर्यंत कुठलीही चर्चा झाली नसल्याने आंदोलनकर्ते त्यांच्या मागण्यांवर ठाम आहेत. जोपर्यंत यावर समाधानकारक तोडगा निघणार नाही. त्याशिवाय आंदोलनातून माघार घेणार नसल्याचे विदर्भ मेंढपाळ धनगर विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष संतोष महात्मे यांनी सांगितले. या आंदोलनाला महाराष्ट्र गवळी समाज संघटनेनेसुध्दा पाठिंबा दर्शविला आहे. आंदोलन कर्त्यानमध्ये संतोष महात्मे केले. यावेळी जिल्हाध्यक्ष जानराव कोकरे, राजू गंधे, अशोक गंधे, शरद शिंदे, रतन यमगर, हरिभाऊ, शिंदे, धोडीराम टाके, मधुकर बिचकुले, रामभाऊ जुमडे, रामकृष्ण गावनेर, अवकाश बोरसे, संगीता ढोके, नीलेश मस्के, सचिन ढगे, श्याम बोबडे, राजेंद्र बोडखे, गवळी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष अभिमान डोईजड, जिल्हा परिषद सदस्य सदाशिव खडके, सलीम मिरावाले यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)

Web Title: The troupe movement continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.