पठाणकोट येथील शहिदांना श्रद्धांजली
By Admin | Updated: January 13, 2016 00:43 IST2016-01-13T00:43:01+5:302016-01-13T00:43:01+5:30
जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाची बैठक जिल्हा कार्यालय साई मंदिर रोड येथे पार पडली. प्रथम या सभेत पठाणकोट हल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रध्दांजली देण्यात आली.

पठाणकोट येथील शहिदांना श्रद्धांजली
पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची सभा
भंडारा : जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाची बैठक जिल्हा कार्यालय साई मंदिर रोड येथे पार पडली. प्रथम या सभेत पठाणकोट हल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रध्दांजली देण्यात आली. जिल्ह्यातील तालुकाध्यक्ष व सर्व सेलच्या अध्यक्षांकडून आढावा घेण्यात आला. संघटन कसे मजबुत करावे, या विषयावर चर्चा करण्यात आली.
सभेला प्रदेश सचिव धनंजय दलाल, जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे माजी राज्यमंत्री नाना पंचबुध्दे, मधुकर सांभारे, नगराध्यक्ष बाबुराव बागडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती शुभांगी रहांगडाले, सभापती नरेश डाहारे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका सेलच्या पदाधिकाऱ्यांकरवी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी सभेला नगरसेवक महेंद्र गडकरी, अविनाश ब्राम्हणकर, विनयमोहन पशिने, लोमेश वैद्य, धनराज साठवणे, हाजी सलाम, ज्योती खवास, रुबी चढ्ढा, अख्तरी बेगम, किरण कुंभरे, कल्याणी भुरे, डॉ. विजय ठक्कर, धनंजय व्यास, नारायण राजपुत, ज्योती टेंभुर्णे, सुनंदा मुंडले, योगेश सिंगनजुडे, नरेंद्र झंझाड, सुमेध श्यामकुंवर, डॉ. जगदिश निंबार्ते, गुणवंत काळबांडे, सुरेश बघेल, शैलेश मयुर यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक विजय डेकाटे यांनी तर आभार प्रदर्शन स्वप्नील नशिने यांनी केले. (प्रतिनिधी)