शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

आदिवासी लाभार्थ्यांची दोन वर्षांपासून पायपीट

By admin | Updated: August 12, 2015 00:45 IST

चिमूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत प्रकल्पातील आदिवासी दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना देण्यात ...

तारखेत घोळ : अधिकाऱ्यानेही डोळे बंद करून केली स्वाक्षरीचिमूर : चिमूर येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत प्रकल्पातील आदिवासी दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या एचडीपीई पाईप मंजुरीबाबतचे पत्र २ जुलै २०१३ ला जारी केले. परंतु साक्षांकित प्रती १६ जून २०१३ ला सादर कराव्या, असे कळविले. या साऱ्या प्रकारात आदिवासी प्रकल्पाने घोडचूक करून ठेवली असली, तरी संबंधित लाभार्थ्याला गेल्या दोन वर्षांपासून अकारण या कार्यालयाची पायपीट करावी लागत आहे. एवढेच नव्हे, तर दोन वर्षांचा कालावधी लोटून गेला असला तरी लाभार्थ्याला अद्याप पाईप देण्यात आले नाही.आदिवासी उपाययोजना केंद्र पुरस्कृत आदिवासी कुटुंबासाठी सर्वांगीण विकासाच्या वैयक्तिक व सामूहिक योजना राबविल्या जाते. आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चिमूर अंतर्गत येणाऱ्या टेकेपार येथील कवडू रामाजी पेंदाम या लाभार्थ्याला सन २०१२-१३ या सत्रात एचडीपीई पाईप मंजुरीबाबत प्रकल्प कार्यालयाचे पत्र (क्र.पाईप १३/प्रक/का/४-ब/३४६५/१३ दि. २-७-२०१३) मिळाले. आपली आदिवासी बीपीएल शेतकऱ्यांना १०० टक्के सुटीवर एचडीपीई पाईप पुरवठा करणे या योजनेंतर्गत निवड झाली असल्याचे सदर पत्राद्वारे कळविण्यात आले. सदर योजनेनुसार एचडीपीई पाईप ताब्यात घेण्यासाठी आपण १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर करारनामा, १०० रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर संमतीपत्र, नजीकचे काळातील पासपोर्ट साईजचे दोन छायाचित्र, तेलपंप किंवा वीज पंपाबाबत आर्थिक सहभाग भरल्याबाबतची पावती किंवा तेलपंप, वीज पंप असल्याचा तलाठ्याचा दाखला, बीपीएलचा नवीन दाखला, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्डची झेराक्स प्रत इत्यादी कागदपत्रे आदिवासी प्रकल्प कार्यालयात १६ जून २०१३ पर्यंत सादर करावे, असे कळविण्यात आले. यातील एक ते सहा कागदपत्रे वरील तारखेस सादर न केल्यास आपले नाव रद्द करून जेष्ठतेनुसार दुसऱ्या लाभार्थ्यास मंजूर करण्यात येईल, असेही पत्रातून सांगण्यात आले. वास्तविक आदिवासी प्रकल्प कार्यालयाने पत्र पाठविण्याच्या तारेखचा महिना जुलै असून कागदपत्रे सादर करण्यासाठी जून महिन्याची १६ तारीख दाखविल्याने तत्पूर्वीच्या महिन्यात कागदपत्रे कशी सादर करावी, असा प्रश्न लाभार्थ्यापुढे उभा ठाकला आहे. यावरून शासकीय कामकाज किती बेफिकिरीने केले जाते, याचा प्रत्यय या घटनेवरून आला आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी होत आहे. (शहर प्रतिनिधी)अफरातफरीची शंकाविशेष म्हणजे संबंधित अधिकाऱ्याने स्वाक्षरी करण्यापूर्वी ते पत्र वाचले नव्हते का, असा प्रश्न उपस्थित केला जात्ां आहे. मंजूर झालेल्या पाईपची अफरातफर तर झाली नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात असून याबाबत चौकशीची मागणी होत आहे.