शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : भारताचा अविश्वसनीय विजय, पाकिस्तानच्या जबड्यातून सामना खेचून आणला; शेजाऱ्यांचे स्पर्धेतून पॅकअप?
2
Narendra Modi Oath Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नवीन मंत्रिमंडळ तयार; पाहा संपूर्ण यादी, महाराष्ट्रातून कोणी घेतली शपथ?
3
स्कॉटलंडच्या विजयाने गतविजेता इंग्लंड स्पर्धेबाहेर होण्याच्या मार्गावर! ब गटाचे विचित्र समीकरण 
4
मोठी बातमी! वैष्णोदेवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांवर दहशतवादी हल्ला; 10 ठार, 33 जखमी
5
लोकसभेत पराभव, तरीही मोदी सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ; भाजपाने काँग्रेसमधून आलेल्या रवनीतसिंग बट्टू यांना दिली संधी
6
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : मॅच सुरू असताना अनोखळी विमान मैदानावर उडाले अन् त्यावरील मॅसेज होतोय Viral
7
वडिलांच्या निधनाने राजकारणात प्रवेश अन् ३ टर्म खासदार; मोदींच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री!
8
राज्यमंत्रिपदाची 'ऑफर' नाकारली, प्रफुल्ल पटेलांनी शपथविधीकडेही पाठ फिरवली!
9
PM Modi Oath-Taking Ceremony : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर अमित शहांनी नाही, 'या' बड्या नेत्याने घेतली शपथ
10
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : विसराळू रोहित शर्मा! Toss दरम्यान घडला मजेशीर किस्सा अन् पुन्हा पावसाचा मारा, Video 
11
PM Modi Oath-Taking Ceremony Live: मोदी 3.0 मध्ये 30 कॅबिनेट मंत्री; केरळमध्ये भाजपचे खाते उघडणारे सुरेश गोपी यांना मंत्रिपदाची संधी
12
चारवेळा मुख्यमंत्री, सहाव्यांदा खासदार; केंद्रात पहिल्यांदाच मंत्री झाले शिवराज सिंह चौहान
13
NCP : राष्ट्रवादीला केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्रिपद का नाही? प्रफुल्ल पटेल यांनी सगळंच सांगितलं
14
T20 World Cup 2024 IND vs PAK Live Match : पाऊस थांबला, खेळपट्टीची पाहणी झाली! सामन्याची वेळ अन् किती षटकांची मॅच तेही ठरलं
15
एकाचे वय 36 तर दुसऱ्याकडे 5000 कोटींची संपत्ती; केंद्रात TDP च्या 'या' दोन खासदारांना संधी
16
व्हीके पांडियन यांची राजकारणातून निवृत्ती; नवीन पटनायक आणि BJD ची मागितली माफी...
17
30 हजार पॅलेस्टाईन समर्थकांचा व्हाईट हाऊसला घेराव, जो बायडन यांच्या विरोधात निदर्शने
18
HDFC बँक ग्राहकांसाठी खुशखबर! EMI चा बोजा कमी होणार; वाचा बँकेचं प्लॅनिंग
19
'मातोश्री'कडून आमदार भास्कर जाधवांवर सोपवली मोठी जबाबदारी
20
Srishti Jain : "कोणाला उचलून घेऊन आलात?"; अभिनेत्री ढसाढसा रडली, सर्वांसमोर झालेला अपमान

मुरुम खनन करताना वृक्षांचे झाले नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 11:42 PM

घाटी तलावात मुरुम खनन करताना तलाव काठावरील वृक्षांना धोका पोहचला. यासंदर्भात तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी मंगळवारला मोका चौकशी व पाहणी केली.

ठळक मुद्देवनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी केली पाहणी : तहसीलदारांना सादर केला अहवाल, महसूल कर्मचाºयांनी दाखविली पाठ

मोहन भोयर।आॅनलाईन लोकमततुमसर : घाटी तलावात मुरुम खनन करताना तलाव काठावरील वृक्षांना धोका पोहचला. यासंदर्भात तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी यांनी मंगळवारला मोका चौकशी व पाहणी केली. तलाव काठावरील पळस व सीता वृक्ष खाली पडलेले दिसले. चौकशीचा अहवाल वनविभागाने मंगळवारी तुमसर तहसीलदारांना सादर केला. महसूल विभागाचे अधिकारी घाटी तलावाकडे आजही फिरकले नाही. येथे घाटी तलावाच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.तुमसर तालुक्यातील सौदेपूर - खैरटोला रस्त्यालगत जंगलाशेजारी घाटी तलावातून मुरुम खननाची परवानगी तुमसर तहसील कार्यालयाने दिली. मुरुम खननाकरिता महसूल विभागाने गट निश्चित केले. परंतु गट निश्चित कागावर केल्यानंतर प्रत्यक्ष मुरुम खनन करण्याला सुरुवात करण्यात आली. मुरुम उत्खनन सुरु असताना त्यावर महसूल विभागाचे नियंत्रण दिसत नाही. तलाव काठावरून येथे मुरुम खनन केले आहे. काठावरील वृक्षांना येथे धोका पोहचविण्यात आला.तुमसरचे वनपरिक्षेत्राधिकारी मंगळवारला घाटी तलावात मौका चौकशी करीता गेले होते. तलाव काठावरील पळस व सीता प्रकाराची वृक्ष पडलेली आढळून आले. पंचनामा करून सविस्तर अहवाल तुमसर तहसील कार्यालयाकडे मंगळवारला सादर केला आहे. तुमसर तहसीलदार नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याची येथे शक्यता आहे.मुरुम खननाची लीज परवानगी प्रसंगी अटी व शर्ती असतात. त्यात झाडे तोडणार नाही, झाडांना इजा पोहचविणार नाही असा नियम आहे. येथे निश्चितच नियमांचा भंग झाल्याचे दिसून येते.तुमसर येथील महसूल प्रशासनाने ५०० ब्रास मुरुम खननाची परवानगी दिली आहे. मुरुम खनन कामाच्या सुरुवातीला महसूल प्रशासनाचे कर्मचारी उपस्थित राहणे गरजेचे होते. मुरुम खनन कामावर येथे नियंत्रण व देखरेख नाही. परवानगी दिली त्यानंतर त्यावर नियंत्रण कोण ठेवणार हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.नियमानुसार मुरुम खनन होत आहे काय? ही पाहण्याची जबाबदारी निश्चितच महसूल प्रशासनाची आहे. महसूल प्रशासनाने येथे कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येते.येथे दुर्लक्षाचे कारण काय? हा संशोधनाचा विषय आहे. ‘लोकमत’ने लक्ष वेधल्यावरही पाच दिवसापासून मोका चौकशी करण्यात आली नाही. विषय महत्वपूर्ण नाही काय? तहसील कार्यालयात डझनभर कर्मचारी आहेत. केवळ कामे आहेत ही कारण पुढे करून वेळ मारून नेली जात आहेत. केवळ कागदोपत्री परवानगी देऊन येथे सोपस्कार पूर्ण करण्यात आले. परवानगी देण्याचा जर अधिकार आहे तर नियमानुसार मुरुम खनन होत आहे किंवा नाही ते पाहण्याचा अधिकार निश्चितच अधिकाऱ्यांना आहे.तलावातून मुरुम खनन करताना विशिष्ट नियमांतर्गत परवानगी दिली जाते. घनदाट जंगलात हे तलाव असल्याने वन्य प्राण्यांना येथे निश्चितच धोका आहे. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी यांनी येथे लक्ष घालून दोषींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.मंगळवारी घाटी तलावाला भेट देऊन मोका चौकशी केली. तलाव काठावरील पळस व सीता वृक्ष पडलेले दिसले. तर दोन वृक्षांजवळून मुरुम खनन करण्यात आले आहे. याचा पंचनामा करून अहवाल तुमसर तहसीलदारांकडे सादर केला आहे.-अरविंद जोशी, वनपरिक्षेत्राधिकारी, तुमसर.सदर जागा जरी वनविभागाची नसली तरी जंगलव्याप्त परिसरात हा तलाव आहे. वन्यप्राण्यांचा जीव तलावातील खड्ड्यांमुळे धोक्यात आहे. वनविभागाने येथे दक्षता घेण्याची गरज होती. संबंधित विभागाने येथे वनविभागाला कळविणे गरजेचे होते.-कमलाकर निखाडे, सामाजिक कार्यकर्ता, तुमसर.