वृक्षतोड प्रकरण पोलीस ठाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 22:25 IST2018-06-17T22:25:10+5:302018-06-17T22:25:29+5:30
सोनेगाव शेत शिवारात असणाऱ्या पाटबंधारे विभागाचे उजव्या कालव्यावरील करण्यात आलेल्या शासकीय झाडांचे कत्तल प्रकरण थेट सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहे. परंतु या प्रकरणात कारवाई शून्य आहे. सिहोरा परिसरातील शेत शिवारात झाडांची कत्तल बेपर्वा सुरु आहे.

वृक्षतोड प्रकरण पोलीस ठाण्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
चुल्हाड (सिहोरा) : सोनेगाव शेत शिवारात असणाऱ्या पाटबंधारे विभागाचे उजव्या कालव्यावरील करण्यात आलेल्या शासकीय झाडांचे कत्तल प्रकरण थेट सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहे. परंतु या प्रकरणात कारवाई शून्य आहे.
सिहोरा परिसरातील शेत शिवारात झाडांची कत्तल बेपर्वा सुरु आहे. वन विभागाचे नियंत्रणात ठेकेदारांची दबंगगिरी सुरु झाली आहे. झाडांची विक्री व खरेदी करतांना वन विभागाचे प्रक्रियेतून ठेकेदारांना समोर जावे लागत आहे. यामुळे वन विभागाचे कर्मचारी आणि ठेकेदाराचे संबंधात जवळीकता येत आहे. यामुळे परिसरातील प्रत्येक गावात एका ठेकेदारांचा उदय झाला आहे. या ठेकेदारांनी शेत शिवाराचे अस्थित्व मैदानी केले आहे. याच ठेकेदारांनी झाडांची कत्तल करतांना शासकीय झाडांना सोडले नाही. सोनेगाव गावाचे शेत शिवारात पाटबंधारे विभागाचे उजव्या कालवा आहे. या कालव्यावर असणारी शासकीय ९ झाडे पटले नामक ठेकेदाराने रात्री कत्तल केला. या झाडांची टॅक्टरने अंधाराचा फायदा घेत विल्हेवाट लावली आहे.
गावातील काही नागरिकांना शासकीय झाडे चोरी करतांना दिसले. त्यांनी पाटबंधारे विभाग आणि हरदोली वन विभाग कार्यालयाचे यंत्रणेला सांगितले. गावकºयांनी ठेकेदाराचे नाव सुध्दा सांगितले. परंतु पाटबंधारे विभागाने अज्ञात आरोपी चे नाव समोर करुन सिहोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
झाडांची चोरी व कत्तल संदर्भात असणारी फिर्यादी वनविभागाचे अखत्यारित असल्याने चौकशी आणि कारवाई करिता हरदोलीचे वन विभाग कार्यालयात पाठविण्यात आली आहे. परंतु वनविभाग यंत्रणेच्या कर्मचाºयांनी तीन किमी अंतरावरील रुपेरा गावातील वास्तव्यास असलेला ठेकेदार आरोपी सापडत नाही. महिला भरात पाटबंधारे विभागाचे मुख्य कालव्यावरील शासकीय झाडांची कत्तल करण्यास ठेकेदारानी सुरुवात केली आहे.
धनेगाव नंतर आता सोनेगाव गावाचे हद्दीत झाडांचे बुंध्दे फक्त साक्ष देत आहेत. हा सर्व प्रकार वन विभागाचे यंत्रणेला माहित आहे. याच ठेकेदारांना यंत्रणेतील काही कर्मचारी छुपा पाठिंबा देत असल्याने ठेकेदारांनी मुजोरी वाढली आहे. सोनेगाव गावाचे हद्दीत करण्यात आलेल्या कत्तल प्रकरणात झाडाचे नगाची वाढती संख्या आहे. या आधी ही संख्या चार होती. पंरतु ठाण्याचे तक्रारीत नऊ अशी नोंद करण्यात आली आहे.
त्यामुळे आकडा फुगत आहे. झाडांचे कत्तल प्रकरणात पटले नामक ठेकेदाराने झाडे तोडल्याची कबुली दिली आहे. परंतु वनविभाग कर्मचाºयांचे साटेलोटे असल्याने थेट या ठेकेदारावर गुन्ह्याची नोंद करण्यात आली नाही. यामुळे वनविभागातच पाणी मुरत असल्याचे दिसून येत आहे. अर्धे अधिक जंगलात झाडाची कत्तल होत आहे. झाडे कापणारे ठेकेदाराचे नाव माहित होत असताना मधुर संबंधाने कारवाई करण्यात येत नाही. परंतु शेतकºयांचे घरात लाकडाची चौकशी करण्याची लगबग वन विभागाचे यंत्रणा दाखवित आहे. शासकीय झाडांची कत्तल केली असल्याची कबुली पटले नामक ठेकेदाराने दिली असतांना हरदोली वन विभागाची यंत्रणा पांघरुन घालत आहे. यामुळे कुंपनच शेत खात असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणात दोषी वन विभागाचे कर्मचारी व कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
सोनेगाव शिवारात शासकीय झाडांची कत्तल कंत्राटदाराने केली. नावे सांगितली परंतु कारवाई करीता कुणीही पुढाकार घेतलेला नाही. चौकशी झाली पाहिजे.
- जितेंद्र घोडीचोर
शेतकरी, सोनेगाव