मानसिक मनोरुग्णांना मानवतेची वागणूक द्या
By Admin | Updated: October 15, 2016 00:35 IST2016-10-15T00:35:39+5:302016-10-15T00:35:39+5:30
मानसिक रूग्णांना वेडा म्हणून नये. त्यांच्याकरिता न्यायालयाने अनेक फायद्यांचा निर्णय घेतलेला आहे.

मानसिक मनोरुग्णांना मानवतेची वागणूक द्या
न्यायाधीश एस.एस. सय्यद : पवनीत मानसिक आरोग्य दिन
पवनी : मानसिक रूग्णांना वेडा म्हणून नये. त्यांच्याकरिता न्यायालयाने अनेक फायद्यांचा निर्णय घेतलेला आहे. त्यांना सामान्य लोकांप्रमाणे अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. मानसिक व विकलांग रूग्णांना मानवतेची वागणूक द्यावी, असे प्रतिपादन न्यायाधीश एस.एस. सय्यद यांनी व्यक्त केले.
तालुका विधी समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मानसिक आरोग्य दिन शिबिरात ते बोलत होते.
यावेळी अॅड. एस. एस. तलमले यांनी मानसिक रूग्णांकरिता असणारे फायदे व संरक्षण यासंबंधाने मार्गदर्शन केले. तर अॅड. तुळसकर यांनी मनोरूग्णांना सन्मानाची वागणूक द्यावी, असे मत व्यक्त केले. अॅड. एस.डी. सावरगर यांनी मानसिक रूग्णांची कारणे व मानसिक तणाव यावर विचार व्यक्त केले. तर अॅड. काटेखाये यांनी मानसिक रूग्णांना सहानुभूतिची आवश्यकता याविषयी मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस. डब्ल्यु. कावळे यांनी केले. संचालन अॅड. गजभिये यांनी केले. तर आभार अॅड. राहूल बावणे मानले. यावेळी जेष्ठ वकील अॅड. व्ही.सी. खोब्रागडे, अॅड. भुरे, अॅड. देशमुख, सामाजिक कार्यकर्ता डॉ. भागवत, आकरे तथा वकील संघाचे सदस्यगण उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)