एसटीच्या रातराणीसह ट्रॅव्हल्स बसेसना प्रवाशांची सारखीच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:42+5:302021-07-14T04:40:42+5:30

एसटीपेक्षा तिकीट जास्त एसटी महामंडळाची लालपरी ही आजही सर्वसामान्यांना परवडणारी आहे. एसटी वाहतूक म्हणजे सुरक्षित वाहतूक असे समजले जाते. ...

Travels buses with ST's nightlife are equally preferred by passengers | एसटीच्या रातराणीसह ट्रॅव्हल्स बसेसना प्रवाशांची सारखीच पसंती

एसटीच्या रातराणीसह ट्रॅव्हल्स बसेसना प्रवाशांची सारखीच पसंती

एसटीपेक्षा तिकीट जास्त

एसटी महामंडळाची लालपरी ही आजही सर्वसामान्यांना परवडणारी आहे. एसटी वाहतूक म्हणजे सुरक्षित वाहतूक असे समजले जाते. सध्या डिझेलच्या दरांमध्ये झालेली दरवाढ पाहता ट्रॅव्हल्सचे तिकीट वाढले आहेत. मात्र एसटी बसचे तिकीट मात्र आजही तेवढीच आहे. नागपूर सोलापूर एसटीचे तिकीट तेराशेच्या दरम्यान तर ट्रॅव्हल्सचे तिकीट सोळाशे रुपये आहे. बॉक्स

स्वच्छ आरामदायी प्रवास

ट्रॅव्हल्सचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे नसले तरीही ट्रॅव्हल्समध्ये असलेली स्वच्छता आणि स्लीपर कोचचा प्रवास यामुळे मध्यमवर्गीय, नोकरदार मंडळींकडून नेहमीच ट्रॅव्हल्सला प्राधान्य दिले जाते. याशिवाय रात्रीचा प्रवास करून दुसऱ्या दिवशी वेळेत कार्यालयात आम्हाला जाणे शक्य होते.

विकास मुळे, ट्रॅव्हल्स प्रवासी

एसटीचा प्रवास गरिबांना परवडणारा आणि सुरक्षित प्रवासाची हमी असल्याने मी नेहमी एसटीलाच प्राधान्य देतो. एसटी प्रवास आराम बसच्या तुलनेत थोडा त्रासदायक असला तरी शिवशाही, विठाई, अशियाड बसेसही आधुनिक आहेत. मात्र सुरक्षेची हमी असल्याने माझ्यासह माझे कुटुंब नेहमी एसटीनेच प्रवास करते.

श्याम ठाकरे, एसटी प्रवासी.

बॉक्स

भंडारा आगारात स्लीपर नाही

भंडारा विभागात स्लीपर कोच बस मात्र उपलब्ध नाही. भंडारा जिल्ह्यात एसटी महामंडळाचे जवळपास सहा आगार आहेत. यात लॅाकडाऊन काळात अनेक बसेस बंद करण्यात आल्या होत्या. सध्या जिल्ह्यातून लांब पल्ल्याच्या बसेस सुरू आहेत.

बॉक्स

एसटीच्या सुरू असलेल्या रातराणी बसेस

गोंदिया, भंडारा, नांदेड, भंडारा, औरंगाबाद, अकोला, अमरावती मार्गावर लांब पल्ल्याच्या बसेस सुरू आहेत. त्यातच नागपूर शहर हे भंडारापासून अवघ्या एक तासाच्या अंतरावर असल्याने भंडारा ते नागपूर बसेस सुरू आहेत. मात्र सध्या गोंदिया ते नांदेड ही एकमेव रात्र बस धावत आहे.

बॉक्स

भंडारा विभागात स्लीपर नाही

एसटी महामंडळातर्फे खासगी प्रवासी वाहतुकीची स्पर्धा करण्यासाठी स्लीपर कोच बस देण्यात आल्या आहेत. मात्र भंडारा विभागात सहा आगारांपैकी एकाही आगाराला स्लीपर बस मिळालेली नाही. राज्यातील मोठ्या शहरांमध्ये या स्लीपर बसेस देण्यात आल्या आहेत.

Web Title: Travels buses with ST's nightlife are equally preferred by passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.