देवलगावचा प्रवासी निवारा कचऱ्यात

By Admin | Updated: June 24, 2015 01:14 IST2015-06-24T01:14:22+5:302015-06-24T01:14:22+5:30

गोंदिया-चंद्रपूर मुख्य मार्गावरील देवलगाव असून या ठिकाणी माजी आ. दयाराम कापगते यांच्या निधीमधून तयार करण्यात आलेल्या ...

Traveler of the city of Devalgaon in the trash | देवलगावचा प्रवासी निवारा कचऱ्यात

देवलगावचा प्रवासी निवारा कचऱ्यात

बाराभाटी : गोंदिया-चंद्रपूर मुख्य मार्गावरील देवलगाव असून या ठिकाणी माजी आ. दयाराम कापगते यांच्या निधीमधून तयार करण्यात आलेल्या प्रवासी निवारा कचऱ्यात आहे. काही दिवस तिथे स्वच्छता होती. मात्र आता हा प्रवासी निवारा कचऱ्यामध्ये अडकला असून याकडे संबंधितांचे दुर्लक्ष आहे.
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील देवलगावचा प्रवासी निवारा घाणीच्या साम्राज्यात आहे. याकडे कुण्या पदाधिकाऱ्यांचे, आमदारांचे, खासदारांचे, मंत्र्याचे, जि.प. पदाधिकाऱ्यांचे अजिबात लक्षच नाही. या प्रवासी निवाऱ्यावर धानाची, खताची, सिमकार्डसाठी खासगी कंपन्याच्या जाहिराती चिकटवलेल्या दिसत आहेत. तसेच या प्रवासी निवाऱ्यामध्ये जनावरांचा चारा ठेवण्यात आला असून मुरमाने खराब झालेला आहे. याच प्रकारामुळे प्रवासी हे निवाऱ्यात न बसता बाहेरच थांबने अधिक पसंत करतात.
सदर प्रवासी निवारा माजी आ. दयाराम कापगते यांच्या निधीतून १९९८-९९ मध्ये तयार करण्यात आला होता. काही दिवस याचा उपयोग चांगला करण्यात आला. मात्र आता त्याकडे पाहण्याची इच्छा होत नाही. माणसांऐवजी कुत्रे व इतर जनावरांचा येथे वास्तव्य असतो. या निवाऱ्याच्या चारही बाजूला हिरवागार गवत दहा वर्षांपासून नेहमीच दिसत आहे. पण गावकऱ्यांचेही लक्ष नाही. देवलगाव हे श्रीमंत, पाटीलशाही थाट व राजकीय क्षेत्रांनी परिपूर्ण आहे. पण येथील प्रवासी निवाऱ्याकडे कोणत्याही पदाधिकाऱ्यांची नजर जात नाही. लक्ष गेलेच तर त्याची दुरावस्था दिसत नाही.
सदर निवाऱ्यात कोणताही प्रवाशी थांबत नाही. प्रवासी रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करणे अधिक पसंत करतात. मात्र पदाधिकाऱ्यांचे ठाम दुर्लक्ष आहे. सध्या सर्वच जण निवडणुकीच्या कामात व्यस्त आहेत. पण विकास कामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. (वार्ताहर)

Web Title: Traveler of the city of Devalgaon in the trash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.