जीवघेण्या पुलावरुन वाहतूक सुरू

By Admin | Updated: June 14, 2015 01:50 IST2015-06-14T01:50:56+5:302015-06-14T01:50:56+5:30

कटंगी - तुमसर राज्यमार्गावर पवनारा येथील मागील दोन वर्षापासून कठडे विरहित पुलामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून ..

Transportation from the fatal bridge | जीवघेण्या पुलावरुन वाहतूक सुरू

जीवघेण्या पुलावरुन वाहतूक सुरू

तुमसर- कटंगी कठडे विरहित पुलावर खड्डे
जिल्हा प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष
तुमसर : कटंगी - तुमसर राज्यमार्गावर पवनारा येथील मागील दोन वर्षापासून कठडे विरहित पुलामध्ये मोठमोठे खड्डे पडले असून दुचाकी व चारचाकी वाहन चालकांना पुल पार करताना कमालीची कसरत करावी लागते. भविष्यात मोठी दुर्घटना होण्याचे दिसत असताना मात्र याकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधीचे अक्षम्य दुर्लक्ष दिसून येत आहे.
मध्यप्रदेश व महाराष्ट्राला जोडणाऱ्या राज्यमार्गावर पवनारा येथे एकमेव पुलाचे बांधकाम इंग्रज काळात करण्यात आले होते. १०० वर्ष पूर्ण होऊनही या पुलाचे नुतनीकरण डागडूजी करण्यात आले नाही. याच पुलावर मागील दोन वर्षापूर्वी चारचाकी वाहन कोसळून सहा लोकांचा मृत्यू झाला होता.
मागीलवर्षी कार पुलाखाली कोसळून झाडाला लटकली. मात्र सुदैवाने जिवितहानी झाली नाही. याच मार्गावर आशिया खंडात प्रसिद्ध मॅग्नीजच्या खाणी डोंगरी (बुज) व चिखला येथे आहेत. मध्यप्रदेशात तिरोडी व भरवेली येथे मॅग्नीजच्या खाणी आहेत.
ओव्हरलोड मॅग्नीजने भरलेल्या ट्रकांची वर्दळ सुरु असून २४ तास राज्य मार्ग सुरु असतो. त्यामुळे संभावता रात्रीच्या वेळी कठडे विरहित पुल पार करताना पुलावर पडलेल्या खड्डयांतून वाहन गेल्यास वाहन चालकांचे नियंत्रण सुटून अपघात होऊन दुर्घटना होऊ शकते. प्रसंगी जिवीतहानी होऊ शकते. त्यामुळे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Transportation from the fatal bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.