रेतीची वाहतूक, ट्रक ताब्यात
By Admin | Updated: May 22, 2017 00:48 IST2017-05-22T00:48:10+5:302017-05-22T00:48:10+5:30
राष्ट्रीय महामार्गावर रेती-मातीची अवैधरीत्या वाहतूक होत असते. हीच बाब हेरुन भंडाराचे तहसीलदार

रेतीची वाहतूक, ट्रक ताब्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
जवाहरनगर : राष्ट्रीय महामार्गावर रेती-मातीची अवैधरीत्या वाहतूक होत असते. हीच बाब हेरुन भंडाराचे तहसीलदार संजय पवार यांनी आज रविवार २१ मे रोजी भंडारा-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर दबा धरुन बसले.
सकाळी ९.३० वाजता सुमारास भंडाराकडून नागपूर दिशेने ट्रक क्रमांक एम एच ३६ एफ २३६० व ट्रक क्रमांक एम एच ३६ एफ ३७७१ हे दोन्ही ट्रक संशयीतरित्या जातांना आढळले. लगेच त्यांना थांबवित चौकशी केली असता. ट्रक क्रमांक २३६० हे पाच ब्रास रेती म्हण्जो क्षमतेपेक्षा जास्त रेतीची वाहतुक करतांना आढळले. दोन ट्रक ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन जवाहरनगर येथे जमा केले. या कारवाईप्रसंगी मंडळ अधिकारी जयंत सोनवाने परसोडीचे तलाठी कुमुदनी क्षिरसागर उपस्थित होते.