निर्माणाधीन दुकानाची गाळे फूटपाथ दुकानदारांना हस्तांतरित करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST2021-06-09T04:43:28+5:302021-06-09T04:43:28+5:30
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी : पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन भंडारा : नगर परिषदेतर्फे वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेंतर्गत मिस्कीन टँक गार्डन ...

निर्माणाधीन दुकानाची गाळे फूटपाथ दुकानदारांना हस्तांतरित करा
राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी : पालिका मुख्याधिकारी यांना निवेदन
भंडारा : नगर परिषदेतर्फे वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेंतर्गत मिस्कीन टँक गार्डन व हुतात्मा स्मारकमधील निर्माणाधीन दुकानांची गाळे फूटपाथ दुकानदारांना त्वरित हस्तांतरित करा, अशा मागणीचे निवेदन भंडारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा महासचिव राहुल वाघमारे यांनी नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
भंडारा शहरात नगर परिषदेकडून वैशिष्ट्यपूर्ण विकास योजनेंतर्गत मिस्कील टँक परिसरात व हुतात्मा स्मारक लाल बहादूर शास्त्री चौक परिसरात जवळपास १३० निर्माणाधीन दुकानांची टिनाची गाळे मागील ३-४ वर्षांपूर्वी तयार करण्यात आले आहेत. फूटपाथवर बसणाऱ्या दुकानदारांना अद्यापपर्यंत वाटप करण्यात आलेले नाही. त्यामुळे फूटपाथ दुकानदार उघड्यावर व्यवसाय करीत आहेत.
गाळ्यांची अवस्था फारच दयनीय झालेली आहे. गाळे टिनाची असल्याने जंग खात आहेत. ज्या उद्देशाने दुकानाची गाळे तयार करण्यात आली त्या उद्देशाची पूर्तता न.प.कडून केली गेली नाही. तसेच गाळ्यांची किंमत वाजवीपेक्षा जास्त असल्याने फूटपाथ दुकानदारांना विकत घेणे अशक्य होत आहे. यावरून नगर परिषदेकडून हेतुपरस्सर दुकानांचे गाळे वाटप करण्यास इच्छुक दिसत नाहीत. याबाबत नगर परिषदेला वारंवार पत्र देऊनसुद्धा कोणत्या प्रकारची दखल घेतली जात नाही. नगर परिषदेने तयार करण्यात आलेले दुकानांचे गाळे फूटपाथ दुकानदारांना तत्काळ प्रभावाने गरजू फूटपाथ दुकानदारांना त्वरित हस्तांतरित करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.