दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थानांतरण ठरले डोकेदुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:37 IST2021-07-27T04:37:24+5:302021-07-27T04:37:24+5:30
सुमारे ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीच विविध कामांसाठी वर्दळ असते. दुय्यम निबंधक कार्यालय काही ...

दुय्यम निबंधक कार्यालयाचे स्थानांतरण ठरले डोकेदुखी
सुमारे ८९ गावांचा समावेश असलेल्या लाखांदूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात नेहमीच विविध कामांसाठी वर्दळ असते. दुय्यम निबंधक कार्यालय काही वर्षांपासून एका भाड्याच्या इमारतीत सुरू होते. विविध प्रशासकीय कामांसाठी इंटरनेट सुविधा असल्याने नियमित कामे पार पाडली जात होती; मात्र गत १५ दिवसांपूर्वी कार्यालयाचे नवीन तहसील कार्यालय इमारतीत स्थानांतरण करण्यात आले.
मात्र या इमारतीत इंटरनेट सेवा उपलब्ध होत नाही. त्यामुळे लिंक फेल असल्याचे सांगितले जाते. यामुळे अनेक शेतकऱ्यांची विक्रीपत्रे, बंधपत्रे यासह प्रशासकीय कामेदेखील खोळंबली आहेत.
याप्रकरणी शासन प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन दुय्यम निबंधक कार्यालयात आवश्यक इंटरनेट सुविधा उपलब्ध करण्याची मागणी आहे.