रश्मी नांदेडकर यांचे स्थानांतरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 23:34 IST2019-07-15T23:34:24+5:302019-07-15T23:34:37+5:30
येथील अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे स्थानांतरण नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी झाले आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

रश्मी नांदेडकर यांचे स्थानांतरण
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : येथील अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे स्थानांतरण नागपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलीस अधीक्षक पदी झाले आहे. त्यांच्या ठिकाणी पुणे येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर या भंडारा येथे गत अडीच वर्षांपासून कार्यरत होत्या. त्यांनी आपल्या कार्यकाळात गुन्हेगारीला आळा घालण्यात मोठी कामगिरी बजावली.
आता त्यांचे स्थानांतरण नागपूर येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस अधीक्षक पदावर करण्यात आले आहे तर भंडारा येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून पुणे येथील महामार्ग सुरक्षा पथकाचे पोलीस उपअधीक्षक अनिकेत गंगाधर भारती पदोन्नतीने येत आहेत.