शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मोहाडी तहसीलदारांची बदली करा हो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2022 05:00 IST

सहा महिन्यांपूर्वी मोहाडी तहसील कार्यालयात रुजू झालेले तहसीलदार दीपक कारंडे यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला. त्यांची ओळख सिंघम म्हणून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात झाली. आता दहा दिवसांपूर्वी तहसीलदारांनी सर्वच घाटांवर २४ तास तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांचा खडा पहारा लावला आहे.

सिराज शेखलोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : रेती चोरीसाठी प्रसिद्ध मोहाडी तालुक्यातील मुंढरी, रोहा, कुरोडा, बेटाळा, मोहगाव देवी, खमारी, नेरी व पांचगाव रेतीघाटावर तहसीलदारांनी २४ तास खडा पहारा सुरू केला. नेहमी पहाटेला ट्रॅक्टर, जेसीबीने गजबज राहणाऱ्या या घाटांवर आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे. रेती माफियांची मोठी कोंडी होत आहे. त्यामुळे रेतीमाफिया आता लोकप्रतिनिधींना एकदाची तहसीलदारांची बदली करा हो, असे साकडे घालत आहेत.तालुक्यातून वाहणारी वैनगंगा व सुर नदी रेतीचोरांसाठी तसेच काही भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी वरदान ठरली आहे. यातील काहींनी या काही वर्षात चांगली माया जमविली; मात्र सहा महिन्यांपूर्वी मोहाडी तहसील कार्यालयात रुजू झालेले तहसीलदार दीपक कारंडे यांनी रेती माफियांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली. अनेक वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा सपाटा सुरू केला. त्यांची ओळख सिंघम म्हणून तालुक्यात नव्हे तर जिल्ह्यात झाली. आता दहा दिवसांपूर्वी तहसीलदारांनी सर्वच घाटांवर २४ तास तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल यांचा खडा पहारा लावला आहे. नदीतून काढून कुरोडा स्मशानभूमीजवळील १५० ते २०० ब्रास व रोहा येथील उत्तरेकडील तलावाजवळील २०० ब्रास डम्पिंग केलेली रेतीसुद्धा जप्त करण्यात आली. नदीतून दररोज १०० ब्रास रेतीची होणारी चोरी बंद झाली. रोहा, बेटाळा येथे ट्रॅक्टर, टिप्पर, जेसीबी अंगणाची शोभा वाढवीत आहे. 

कोट्यवधींचा महसूल प्राप्त

- सहा महिन्यात तहसीलदार कारंडे यांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने जवळपास चार कोटींचा महसूल प्राप्त झाला. नागपूर विभागात हा एक रेकाॅर्ड आहे. जवळील भंडारा, तुमसर आणि पवनी तालुक्यातसुद्धा वैनगंगा नदीचे मोठे रेती घाट असून, तिथेही अवैध रेती उपसा सुरू असतो; मात्र धडक कारवाई होत नसल्याने इतका महसूल दोन वर्षातसुद्धा प्राप्त झाला नसेल.सुपूर्दनाम्यावर वाहन सोडणे बंद- वाहन जप्त करून दंड ठोठावला तर रेतीमाफिया दंड न भरता वाहन सुपूर्तनाम्यावर सोडवून घेत होते.  घेर्त्यामुळे वाहनावर कारवाई झाली तरी टेन्शन नव्हते. यावर येथील तहसीलदारांनी सोडून दिलेल्या वाहनाविरुद्ध उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात शासनाच्यावतीने अपील  दाखल केले. याचिकेतील युक्तिवाद ग्राह्य मानून उच्च न्यायालयाने शासनाच्या बाजूने निकाल दिला. त्यामुळे आता पकडलेली वाहने दंड भरल्याशिवाय सुपूर्तनाम्यावर सोडणे बंद झाले.

 

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदार