अपंग मुलांच्या पालकांचे प्रशिक्षण
By Admin | Updated: January 23, 2016 00:57 IST2016-01-23T00:57:58+5:302016-01-23T00:57:58+5:30
विशेष गरजधारक विद्यार्थ्यांच्या अडचणींची माहिती देण्यासाठी त्यांच्या पालकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बुधवारला करण्यात आले होते.

अपंग मुलांच्या पालकांचे प्रशिक्षण
भंडारा : विशेष गरजधारक विद्यार्थ्यांच्या अडचणींची माहिती देण्यासाठी त्यांच्या पालकांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन बुधवारला करण्यात आले होते. सर्व शिक्षा अभियान अपंग (दिव्यांग) समावेशीत शिक्षण पंचायत समिती भंडारा अंतर्गत घेण्यात आले.
यावेळी गटशिक्षणाधिकारी तिडके, चंद्रप्रभा वडे, विषयतज्ज्ञ वंदना गोडघाटे यांची उपस्थिती होती. यावेळी तिडके यांनी, पालकांना अपंग समावेशित शिक्षण या उपक्रमाविषयी मार्गदर्शन केले. व अपंग बालकांना शिक्षणाच्या मुख्य प्रावाहात सामील करण्यात आल्याची माहिती दिली. या प्रशिक्षण वर्गात अंध, अल्पदृष्टी, मतिमंद, कर्णबधिर, स्वमग्न, मेंदूचा पक्का घात, अस्थिव्यंग, बहूविकलांग अशा सर्व प्रकारचे विद्यार्थ्यांचे पालक सहभागी झाले होते.
मार्गदर्शनात अपंग प्रकाराची ओळख, प्रत्येक अपंग प्रकारानुसार असणा-या अडीअडचणी व त्यावर उपाय, अपंग मुलाना सोयीसुविधा, फिजीओथेरपी, साहित्य, स्पिच थेरपी, विशेष प्रशिक्षण समायोजित प्रशिक्षण यांची माहिती देण्यात आली. (शहर प्रतिनिधी)