शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
3
बहिणीसाठी रक्षक नाही, भक्षक ठरले भाऊ; आई-वडिलांनीही पाठ फिरवली, पण होणाऱ्या नवऱ्याने साथ दिली अन्..
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹४ लाख, मिळेल ₹१,७९,६३१ चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
5
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
6
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
7
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
8
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
9
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
10
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
11
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
12
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
13
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
14
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
15
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
16
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
17
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
19
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
20
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे

रेल्वेची धडधड सुरु, पण प्रवाशांची वानवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:01 IST

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत ७० दिवसांपासून रेल्वे प्रवासी वाहतूक बंद होती. दरम्यान काही श्रमीक रेल्वेगाड्या सुरु झाल्या. परंतु त्यांना ठराविक थांबे असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या इच्छूक प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन २ जून पासून मुंबई हावडा मेल व हावडा अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्या सुरु झाल्या आहेत. त्यांना भंडारा रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला.

ठळक मुद्देदोन प्रवासी गाड्या सुरु : दीर्घ काळानंतर रेल्वे स्थानकावर प्रवाशांचे दर्शन, कर्मचाऱ्यात उत्साह

तथागत मेश्राम।लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : कोरोनामुळे ७० दिवसांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रेल्वेगाड्यांची धडधड सुरु झाली. सध्या दोन प्रवासी रेल्वे सुरु करण्यात आल्या असून लांब पल्ल्याच्या या गाड्यांना भंडारा रोड येथे थांबा देण्यात आला. परिणामी प्रवाशांची रेलचेल सुरु झाली. काही महिन्यापूर्वीच हाऊसफुल्ल असणाऱ्या या रेल्वेस्थानकावर प्रवाशांची वानवा मात्र कायम आहे. मोजकेच प्रवासी, रेल्वे कर्मचारी आणि वैद्यकीय चमू येथे कुणीही दिसत नाही.कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गत ७० दिवसांपासून रेल्वे प्रवासी वाहतूक बंद होती. दरम्यान काही श्रमीक रेल्वेगाड्या सुरु झाल्या. परंतु त्यांना ठराविक थांबे असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या इच्छूक प्रवाशांची गैरसोय होत होती. प्रवाशांची ही गैरसोय लक्षात घेऊन २ जून पासून मुंबई हावडा मेल व हावडा अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्या सुरु झाल्या आहेत. त्यांना भंडारा रोड रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला. दोन गाड्यांच्या चार फेऱ्या तात्पुरत्या सुरु करण्यात आल्या आहेत. मंगळवारी दिवसभरात १३ प्रवाशी उतरले व १९ प्रवाशी पुढील प्रवासासाठी गेले.रेल्वेगाड्या सुरु झाल्या असल्या तरी आंतरराज्य प्रवासाला बंदी आहे. विविध राज्यात अडकलेल्या प्रवाशांनाच सवलत देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील इतर भागातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या प्रवाशांना केवळ तिकीट मिळत आहे. रेल्वे अनेक दिवसांपासून बंद आहे. अनेकांनी तिकीट खरेदी केली होती. आता परताव्यासाठी अर्थात तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. परतावा केंद्र सुरु असले तरी पाहिजे त्या प्रमाणात रोकड नसल्याने अनेकांना येरझारा माराव्या लागत आहेत. तीन दिवसात पाच लाख रुपये परत केल्याची माहिती देण्यात आली.फिजीकल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालनभंडारा रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाचा कडेकोट बंदोबस्त आहे. तिकीट केंद्रावर कर्मचारी नेमून देण्यात आले आहेत. तिकीट विक्रीच्या ठिकाणी व रेल्वे फलाटावर फिजीकल डिस्टन्सिंगसाठी सीमा आखून देण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षितेकरिता आवश्यक खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती मुख्य वाणिज्यीक निरीक्षक नितीन पाटील यांनी दिली. सुरक्षा व इतर कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले असून नियमित सफाईवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी दिली.प्रवाशांची आरोग्य तपासणीसध्या प्रवाशांची तुरळक उपस्थिती आहे. मोजकेच प्रवाशी ये-जा करीत आहेत. या सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची थर्मल स्कॅनिंग केली जात आहे. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.विकास मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.रेवनाथ गभणे प्रवाशांची तपासणी करीत आहेत. भंडारा रोड रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची तपासणी करून त्यांना १४ दिवसांसाठी होम क्वारंटाईन करण्याचे निर्देश देण्यात येत आहेत.

टॅग्स :railwayरेल्वे