रेल्वेने उड्डाणपुलाची निविदाच काढली नाही
By Admin | Updated: July 1, 2016 00:42 IST2016-07-01T00:42:22+5:302016-07-01T00:42:22+5:30
तुमसर रोड येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मोठ्या गाजावाजा करून सुरु करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खाते

रेल्वेने उड्डाणपुलाची निविदाच काढली नाही
८० मिटरचे बांधकाम : १४ कोटींचे काम, उड्डाणपूल पूर्णत्वावर प्रश्नचिन्ह\
मोहन भोयर तुमसर
तुमसर रोड येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मोठ्या गाजावाजा करून सुरु करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम खाते मागील एका वर्षापासून बायपास रस्ता व इतर कामे प्रगतीपथावर आहे, परंतु रेल्वे प्रशासनाने ८० मिटर मुख्य सिमेंट उड्डाणपुलाची अजूनपर्यंत निविदाच काढली नाही. त्यामुळे या उड्डाणपुलाचे भविष्य अधांतरीच दिसत आहे.
मुंबई हावडा मुख्य रेल्वेमार्गावर तुमसर - रामटेक - गोंदिया राज्य महामार्गावर तुमसर रोड रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर वाहतुकीची मोठी कोंडी मागील अनेक वर्षापासून सुरु आहे. फाटक दर पाच ते सात मिनिटाला येथे बंद होते. रहदारीला अडथळा व अपघाताला आमंत्रण देणारा हा रस्ता बनला होता. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व रेल्वे मंत्रालयाने संयुक्त उड्डाणपुल बांधण्याचा येथे निर्णय घेतला. तब्बल २५ वर्षानंतर येथे प्रतीक्षा संपली. दोन वर्षापूर्वी तत्कालीन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री प्रफुल्ल पटेल यांनी या उड्डाणपुल बांधकामाचे भूमिपूजन केले होते. तब्बल १९ विभागांच्या परवानग्या या उड्डाणपुल बांधकामाला मिळवाव्या लागल्या होत्या. सुमारे ४२ कोटींचा हा उड्डाणपुल आहे. त्यापैकी १४ कोटी रेल्वे व २८ कोटी राज्य शासन निधी खर्च करणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने एका वर्षापूर्वी प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. या बायपास रस्ता तयार केला असून सध्या भूमाही रस्त्याचे काम सुरु आहे. राज्य शासनाने निविदा काढून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाने स्वत:च्या कामाची अजूनपर्यंत निविदाच काढली नाही. निविदा काढून प्रत्यक्ष कामाला केव्हा सुरुवात होईल हा मुख्य प्रश्न आहे. याविषयी संबंधित विभाग बोलायला तयार नाही.रेल्वे प्रशासनाने कामाला सुरुवात केली असती तर त्या बरोबर येथे सार्वजनिक बांधकाम खात्याला कामे करताना सोयीचे झाले असते. मुख्य सिमेंटचे उड्डाणपुल रेल्वे तयार करणार आहे.बायपास रस्त्याने सध्या वाहतूक सुरु आहे. तुमसर - गोंदिया राज्य मार्गावर मोठी वाहतुकीची वर्दळ आहे. बायपास रस्ता अरुंद असल्याने दरदिवशी येथे किरकोळ अपघात घडतात. रेल्वेने येथे तात्काळ निविदा काढण्याची गरज आहे. राज्य व केंद्रीय लोकप्रतिनिधींनी येथे लक्ष देण्याची गरज आहे.