ट्रेलरची उड्डाण पूल सायडिंगला धडक
By Admin | Updated: June 19, 2016 00:15 IST2016-06-19T00:15:43+5:302016-06-19T00:15:43+5:30
उड्डाणपूल बायपास मार्गावरुन ट्रॅक्टर घेऊन जाणारा ट्रेलर सायडिंगवरून रस्त्याच्या बाजुला झुकला. सुदैवाने ट्रेलर उलटला नाही, त्यामुळे अनर्थ टळला.

ट्रेलरची उड्डाण पूल सायडिंगला धडक
देव्हाडी येथील घटना : १५ दिवसातील दुसरा अपघात
तुमसर : उड्डाणपूल बायपास मार्गावरुन ट्रॅक्टर घेऊन जाणारा ट्रेलर सायडिंगवरून रस्त्याच्या बाजुला झुकला. सुदैवाने ट्रेलर उलटला नाही, त्यामुळे अनर्थ टळला. उड्डाणपूल बायपास रस्ता यू आकाराचा व निमुळता असल्याने जड वाहने जाण्यासाठी अडचण होते. मागील १५ दिवसात हा दुसरा अपघात आहे.
देव्हाडी येथे रेल्वे उड्डाण पूल तुमसर-गोंदिया राज्य महामार्गावर कामे सुरु आहे. येथे बायपास रस्त्यावरुन वाहतूक सुरु करण्यात आली. रामटेक-गोंदिया-तुमसर-गोंदिया तथा रेल्वे स्थानकाकडे जाण्याकरिता रस्ते तयार करण्यात आले. रामटेक-गोंदिया मार्गाकडे जाणारा बायपास रस्ता यु-टर्न आकाराचा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मोठे ट्रेलर व ट्रक येथून वळत नाही. ट्रक चालकाचा अंदाज चुकतो.
शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास चंदीगड येथून गोंदियाकडे ट्रॅक्टर घेऊन जाणारा ट्रेलर क्रमांक आर जे १४ जीजी ६०३९ बायपास रस्त्याच्या सानगडीवरून रस्त्याच्या खाली उतरला. या ट्रकमध्ये वाहक नव्हता. चालकाचा अंदाज चुकल्याने सायडिंगवरून तो खाली गेला. उड्डाण पूल बांधकाम करणारे संबंधित कंत्राटदार व निरीक्षण करणाचा संबंधित विभागाचे अभियंत्यानी बायपास रस्त्याचे बांधकाम दोषपूर्ण केले. येथे रिकाम्या जागेत सिमेंट दगड पुढे ठेवण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)