जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांना पकडले
By Admin | Updated: November 2, 2015 00:46 IST2015-11-02T00:46:02+5:302015-11-02T00:46:02+5:30
ट्रकमध्ये अवैधरीत्या जनावरे कोंबून नेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई काल शनिवारी राष्ट्रीय महामार्गावर ...

जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्यांना पकडले
गुन्हा दाखल : कारधा पोलिसांची कारवाई
भंडारा : ट्रकमध्ये अवैधरीत्या जनावरे कोंबून नेत असताना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई काल शनिवारी राष्ट्रीय महामार्गावर कारधा पोलीस ठाणे अंतर्गत करण्यात आली. यात १८ म्हशींची सुटका करण्यात आली.
राष्ट्रीय महामार्गावर काल शनिवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास ट्रकमध्ये १८ म्हशी निर्दयतेने कोंबून वाहतूक करीत असल्याचे माहिती मिळाली. यात पोलिसांनी चौकशी केली असता. जनावरांना निर्दयतेने वागणूक देणे, आरटीओ परमीटचे उल्लंघन करुन वाहतूक करणे या बाबी उघडकीला आल्या. गडेगाव येथील कुसुम गौरक्षक संस्थेचे अध्यक्ष प्रमोद कुथे यांच्या तक्रारीवरुन कारधा पोलिसांनी ट्रक चालकाविरुध्द प्राणी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. जनावरांची किंमत ८५ हजार रुपये सांगण्यात येत आहे. तपास पोलीस हवालदार मनगटे करीत आहे.
पोळ्याच्या पूर्वसंध्येला बजरंग दलाने अशी कारवाई केली होती. या सारखी कारवाई बैल बाजाराच्या दिवशी जिल्ह्यात होत आहेत. त्यानंतर या जनावरांची गौशाळेत रवानगी करण्यात येते. अनेकदा अवैधरीत्या जनावरांची निर्दयपणे वाहतूक होत असताना प्रशासनाला दिसत असले तरी कारवाई करण्यात मात्र टाळाटाळ होते. (प्रतिनिधी)