रेतीच्या भरधाव ट्रॅक्टरने बालकाला चिरडले

By Admin | Updated: March 12, 2015 00:18 IST2015-03-12T00:18:28+5:302015-03-12T00:18:28+5:30

अंंगणात खेळत असलेल्या एका तीन वर्षीय बालकाला रेती भरुन जाणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने चिरडले. यात या बालकाचा जागीच मृत्यू झाला.

Traffic ravages of the child by the tractor | रेतीच्या भरधाव ट्रॅक्टरने बालकाला चिरडले

रेतीच्या भरधाव ट्रॅक्टरने बालकाला चिरडले

मोहदुरा : अंंगणात खेळत असलेल्या एका तीन वर्षीय बालकाला रेती भरुन जाणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने चिरडले. यात या बालकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना भंडारा शहरापासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या सातोना या गावात बुधवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास सातोना - नेरी या मार्गावर घडली. दरम्यान संतप्त नागरिकांनी ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न केला.
श्रेयस मंगेश हटवार असे मृत बालकाचे नाव आहे. श्रेयस हा आपल्या घरासमोर अंगणात खेळत होता. यावेळी रेती घेऊन एक ट्रॅक्टर नेरीकडून सातोनाकडे जात होता. दरम्यान, समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात या विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरच्या मागील चाकात हा बालक सापडला. यात तो चिरडल्या गेला. यातच त्याचा मृत्यू झाला. तरीही त्याला तातडीने भंडारा येथील रुग्णालयात नेण्यात आले. वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
श्रेयसच्या मृत्यूची बातमी सातोना या गावात माहित होताच संतप्त नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी करीत सातोना - नेरी मार्ग दोन तास अडवून धरला. यादरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांची रांगच रांग लागली होती. या अपघाताला कारणीभूत असलेला ट्रॅक्टर नागरिकांनी जाळण्याचा प्रयत्न केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी ट्रॅक्टर चालक रामसिंग रा.नेरी याला ताब्यात घेतले. तत्पूर्वी नागरिकांनी ट्रॅक्टर चालकांला बेदम मारहाण केली.
पोलिसांनी या ट्रॅक्टरचालकाला ताब्यात घेतले नसते तर परिस्थिती हाताबाहेर गेली असती. जमाव संतप्त असल्यामुळे पोलिसांना अतिरिक्त कुमक बोलवावी लागली. त्यामुळे सातोना या गावाला रात्री उशिरापर्यंत पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. (वार्ताहर)

Web Title: Traffic ravages of the child by the tractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.