वाहतूक संपाचा प्रवाशांना 'दे धक्का'

By Admin | Updated: May 1, 2015 00:43 IST2015-05-01T00:43:23+5:302015-05-01T00:43:23+5:30

वाहतुकीच्या संदर्भात शासन नवीन कायदे बनविण्याच्या विचाराधीन आहे.

Traffic passenger 'push' | वाहतूक संपाचा प्रवाशांना 'दे धक्का'

वाहतूक संपाचा प्रवाशांना 'दे धक्का'

भंडारा : वाहतुकीच्या संदर्भात शासन नवीन कायदे बनविण्याच्या विचाराधीन आहे. याला विरोध म्हणून गुरुवारी वाहतूकदारांनी संपाचे हत्यार उपसले. यात आॅटो-रिक्षा, ट्रान्सफोर्ट व्यावसायिक व एसटीच्या बसेसचाही समावेश असल्याने प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.
याची दखल घेऊन शासनाने तातडीची बैठक बोलाविली. आश्वासनानंतर नाट्यमयरीत्या संप मागे घेण्यात आला. मात्र, पहाटेपासून सुमारे सकाळी ११ वाजेपर्यंत प्रवाशांना याचा फटका बसला. बाहेरगावी जाणारे प्रवाशी व कर्तव्यावर बसेने जाणारे कर्मचाऱ्यांना या संपामुळे ताटकळत बसावे लागले.
केंद्र व राज्य शासनाने रस्ते सुरक्षा विधेयक तयार केले आहे. तो अंमलात आणण्याच्या दृष्टीने विचाराधिन आहे. यात वाहनधारकांसह चालकांनाही फटका बसणार आहे. यासोबतच वाहतूक चालकांसाठी नविन नियम बनविण्यात येणार आहे. या नियमात, चालकाने अतिवेगात वाहन चालवू नये. वाहतूक सिग्नल तोडल्यास दंडात्मक कारवाई व वेळप्रसंगी वाहनचालकाचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. यासोबतच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे खासगीकरण करण्याचा मनसुबा राज्य शासनाने आखला आहे.
यात वाहन चालकांसोबत वाहन मालकांची गळचेपी होणार होती. यामुळे गुरूवारला वाहनधारक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संप पुकारून शासनाचा विरोध करण्याचे ठरविले. त्यासाठी वाहनतुकदारांनी संपाचे हत्यार उपसले. या संपाचा पटका सर्वसामान्यांना बसला. या संपात एसटी बसची मान्यताप्राप्त संघटना उतरल्याने पहाटेपासून बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा फटका बसला. अनेकांना या संपाची कल्पनाच नसल्याने प्रवाशी बसच्या प्रतिक्षेत ताटकळत उभे होते. तर काही प्रवाशी आॅटो-रिक्क्षाच्या प्रतिक्षेत रस्त्यांवर उभे असल्याचे चित्र बघायला मिळाले. (शहर प्रतिनिधी)
कर्मचाऱ्यांना भोवणार 'संप'
जिल्ह्यातील अनेक कर्मचारी हे मुख्यालयी न राहता नित्याने नागपूर किंवा जिल्हास्थळावरून बस किंवा रेल्वेने जाणे येणे करतात. आजच्या संपाची अनेकांना कल्पना नसल्याने त्यांची पुरती वाट लागली. अनेक कर्मचारी बसच्या प्रतिक्षेत बसस्थानकावर ताटकळ उभे होते. काही रेल्वेने प्रवास करतात. पण, आॅटो-रिक्क्षा संपात सहभागी असल्याने त्यांना मुख्यालयी पोहचण्यास विलंब लागला. अनेकांची बायोमेट्रीकवर उशिरा हजेरी लागली. त्यामुळे त्यांच्या विभागप्रमुखाकडून अशा सर्व कर्मचाऱ्यांना कारणेदाखवा नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते.

Web Title: Traffic passenger 'push'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.