शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्य बावनथडी पुलावरील वाहतूक पुन्हा केली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:00 IST

महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्य तुमसर कटंगी मार्ग असून, या मार्गावर नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमण काळात बालाघाटवरून भंडारा-नागपूर येथे रुग्णांची ये-जा सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती गावांमध्ये जावे लागते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक पुन्हा बंद केली आहे. पुलावरील रस्ता व नाली खोदकाम करण्यात आले.

ठळक मुद्देरुग्णवाहिकेचा मार्गही बंद : पूल दुरुस्तीकडे दुर्लक्ष

लाेकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसर कटंगी आंतरराज्य मार्गावर बावनथडी नदीवरील हादरे बसणाऱ्या पुलावरून दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक सुरू होती; परंतु दोन दिवसांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलावरील रस्त्यावर नाली खोदकाम केले, त्यामुळे या वाहनांच्या वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे. हलक्या वाहनांचा मार्ग बंद केल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे. बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती एक वर्षापासून केली नाही. आंतरराज्य महामार्ग असूनही त्याकडे जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केले. सदर प्रकरणात जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी व स्थानिक लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून हलक्या वाहनांची वाहतूक सुरू करण्याची गरज आहे.महाराष्ट्र मध्यप्रदेशला जोडणारा आंतरराज्य तुमसर कटंगी मार्ग असून, या मार्गावर नागरिकांची ये-जा मोठ्या प्रमाणात आहे. कोरोना संक्रमण काळात बालाघाटवरून भंडारा-नागपूर येथे रुग्णांची ये-जा सुरू आहे. तुमसर तालुक्यातील अनेक लोकांना मध्यप्रदेशच्या सीमावर्ती गावांमध्ये जावे लागते; परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने दोन दिवसांपूर्वी दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक पुन्हा बंद केली आहे. पुलावरील रस्ता व नाली खोदकाम करण्यात आले.मागील सप्टेंबर महिन्यात जड वाहतुकीकरिता पूल बंद करण्यात आला होता. नागरिकांनी विरोध केल्यानंतर दुचाकी व हलक्या वाहनांची वाहतूक येथे सुरू करण्यात आली होती. सदर वाहतूक दोन दिवसांपूर्वी बंद करण्यात आली. मागील एक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाने पुलाची दुरुस्ती केली नाही. संबंधित विभाग निविदा काढण्यात आल्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगत आहे; परंतु आंतरराज्य महामार्ग मागील एक वर्षापासून बंद असल्यामुळे वाहतुकीला या ठिकाणी फटका बसत आहे. किमान हलक्या वाहनांना येथे वाहतुकीला परवानगी देण्याची गरज आहे.  वाहतूक  बंदमुळे  तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावरून फेरा मारून जावे लागते.सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या सोयीकरिता उन्हाळ्यात किमान नदी पात्रात तात्पुरता रपटा करण्याची गरज होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सदर समस्येवर जिल्हाधिकारी, पालकमंत्र्यांनी लक्ष घालून तात्काळ ही समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

 

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्पTrafficवाहतूक कोंडी