‘ट्रॅफिक’ वाढतोय!

By Admin | Updated: May 12, 2015 00:36 IST2015-05-12T00:36:30+5:302015-05-12T00:36:30+5:30

जिल्ह्यातील मोजके रस्ते वगळल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन ...

Traffic is growing! | ‘ट्रॅफिक’ वाढतोय!

‘ट्रॅफिक’ वाढतोय!

वाहनांची संख्या वाढली : दुचाकी, चारचाकींची संख्या १७ हजारांवर
देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्ह्यातील मोजके रस्ते वगळल्यास इतर सर्वच रस्त्यांवर नेहमीच दिसणारी वाहतुकीची कोंडी, सतत बाहेर पडणारा कार्बन डायआॅक्साईड, कानठळ्या बसवणारे कर्णकर्कश हॉर्न, वाढते अपघात असे प्रश्न असले तरी दिवसेंदिवस नव्या वाहनांची संख्या वाढत आहे. सार्वजनिक वाहनांची तोकडी सोय आणि खासगी वाहनांच्या संख्येत दरवर्षी पडणारी भर हेच या मागचे मुख्य कारण आहे. खासगी वाहनांच्या तुलनेत सार्वजनिक वाहनांची संख्या केवळ १० टक्केही नाही. सन २०१४- १५ मध्ये जिल्ह्यात वाहनांची संख्या १६,९५२ आहे.
भंडारा जिल्ह्याची लोकसंख्या १२ लाख ७५,४१४ असून दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीही वाढत आहे,, अशी ओरड केली जाते. मात्र गेल्या १० वर्षांत जिल्ह्याच्या लोकसंख्या कमालिने वाढली. याच्या तुलनेत खासगी वाहनांतही मोठी वाढ झाली आहे. खासगी वाहनांची वाढती संख्या हेच वाहतूक कोंडीचे खरे कारण ठरत आहे.
सन २०१३-१४ मध्ये वाहनांची संख्या १६,३२१ होती. वाहतूक कोंडी वा प्रदूषणाचा प्रश्न सोडविण्यासाठी खासगी वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाऱ्या वाहनांपासून ते जलद धावणाऱ्या मोटार सायकल, जीप, मोटारी व ट्रक ट्रॅक्टरसारखी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करतात. यामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावी होते. सन २०१४ -१५ मध्ये जिल्ह्यात १४ हजार ९७२ दुचाकी खरेदी करण्यात आली. यासह इतर वाहने मिळून जिल्ह्यात एकुण वाहन १६,९५२ एवढी आहेत. सन २०१३-१४ मध्ये १४,४७८ दुचाकीसह एकूण १६,३२१ वाहने होती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी दुचाकींच्या संख्येत ४९७ ने वाढ झाली आहे.

दुचाकी विक्रीत वाढ
युवकांना आकर्षित करुन वेगवान धावणाऱ्या दुचाकींची आवड लक्षात घेऊन विविध कंपण्यांनी आकर्षित अश्या दुचाकी बाजारात आणल्या. त्यामुळे महागाईचा विचार न करता ही वडील मंडळींकडे दुचाकी खरेदी करण्यासाठी हट्ट धरताना दिसून येतात. सन २०१३-१४ मध्ये १४ हजार ४७८ दुचाकींची नोंद उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे करण्यात आली होती. तर सन २०१४-१५ मध्ये जिल्हयात एकूण १६ हजार ९५२ दुचाकीची नोंद करण्यात आली. तर सन २०१३-१४ मध्ये ९१० कार वाहन, तर सन २०१४-१५ मध्ये जिल्हयात एकूण ७१६ कारची विक्री झाली. मागील वर्षीच्या तुलनेत १९४ कारची घट झाली आहे.

शहरात वाहतूक
सिग्नलची गरज
भंडारा शहरात वाहतूकीची कोंडी नित्याचीच बाब ठरली आहे. शहरातील त्रिमूर्ती चौक, जिल्हा परिषद चौक, गांधी चौक, राजीव गांधी चौक, लाल बहादूर शास्त्री चौक, नागपूर नाका, खामतलाव चौक या ठिकाणी वाहतूक सिग्नलची अति आवश्यकता आहे. वाहतूक विभाग, जिल्हा प्रशासन, पालिका प्रशासन वाहतूक सिग्नलविषयी अनेक वर्षांपासून तयारी दर्शवित असली तरी नियोजनाअभावी अद्यापही या दिव्यांविषयी जागरुक नाही. प्रायोगिक तत्वाचा अवलंब केल्यानंतर पुढची कारवाई थंडबस्त्यात आहे.

Web Title: Traffic is growing!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.