सुरक्षा उपाययोजना न करताच उड्डाणपुलावरून वाहनांची वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:19+5:302021-07-14T04:40:19+5:30

उच्चदाब वीज वाहिन्यामुळे धोका : रेल्वेचे लोखंडी जाळी लावण्याचे कामे सुरूच तुमसर: बहुप्रतीक्षित देव्हाडी उड्डाणपुलावरून वाहनांची वाहतूक खुली करण्यात ...

Traffic on the flyover resumes without safety measures | सुरक्षा उपाययोजना न करताच उड्डाणपुलावरून वाहनांची वाहतूक सुरू

सुरक्षा उपाययोजना न करताच उड्डाणपुलावरून वाहनांची वाहतूक सुरू

उच्चदाब वीज वाहिन्यामुळे धोका : रेल्वेचे लोखंडी जाळी लावण्याचे कामे सुरूच

तुमसर: बहुप्रतीक्षित देव्हाडी उड्डाणपुलावरून वाहनांची वाहतूक खुली करण्यात आली. रेल्वे ट्रॅकवरील उड्डाणपुलावर लोखंडी जाडी लावण्याचे काम सुरू आहे. येथे धोका होऊ नये म्हणून लोखंडी जाळी रेल्वे प्रशासन लावत आहे. ही कामे पूर्ण झाली नाही. तरीसुद्धा बांधकाम विभागाने उड्डाण पुलावरून वाहतूक सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु वाहतूक सुरू करण्याची एवढी घाई का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई हावडा रेल्वे मार्गावर देव्हाडी येथे उड्डाण पुलाचे बांधकाम करण्यात आले. मागील सहा वर्षापासून या उड्डाणपुलाचे काम सुरू होते. राज्य शासनाच्या अखत्यारीतील उड्डाणपुलाचे दोन्ही बाजूचे काम पूर्ण झाले. रेल्वे ट्रॅकवरील उड्डाणपुलाचे बांधकाम रेल्वे प्रशासनाने केले. पुलाखालून उच्च दाब पाहण्यास गेले आहेत त्यामुळे रेल्वे प्रशासनाने उड्डाणपुलाच्या वर लोखंडी जाळी बसविण्याचे कामे सुरू केली. सध्या ही कामे सुरू आहेत, परंतु ही कामे पूर्ण होण्याच्या आधीच बांधकाम विभागाने पुलावरून वाहतूक सुरू केली.

या पुलावरून चारचाकी व दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू झाली आहे. रेल्वेच्या पुलाखाली उच्च दाब वीजवाहिन्या गेल्या आहेत. सर्वसामान्यांना येथे धोक्याची कल्पना नाही. पुलावरून वाकून पाहणे, फोटो काढणे, व वीज तारावर पाणी सोडणे अशा घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने उड्डाणपुलावर लोखंडी जाळी बसविण्याचा निर्णय घेतला होता. रेल्वे प्रशासनाने ही कामे पूर्ण झाल्यानंतरच पुलावरून वाहतूक सुरू करण्यात येईल, असे सांगितले होते. परंतु सदर कामे पूर्णत्वापूर्वीच पुलावरील वाहतूक सुरू करण्यात आली.

Web Title: Traffic on the flyover resumes without safety measures