तुमसर शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 22:07 IST2018-08-07T22:06:10+5:302018-08-07T22:07:09+5:30

तुमसर शहरातील प्रमुख जवाहर चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या चौकात वाहतूक पोलीस कर्तव्य बजावतात. परंतु ते गेल्यावर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण होते. मंगळवारी दुपारी येथे वाहतूक कोंडी झाली होती. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने सरासरीपेक्षा वाहतूक अधिक असते. येथून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे हे विशेष.

The traffic congestion in the main square of Tumsar city | तुमसर शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी

तुमसर शहरातील मुख्य चौकात वाहतुकीची कोंडी

ठळक मुद्देबायपास रस्ता केव्हा होणार? : गर्दीमुळे अपघाताची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : तुमसर शहरातील प्रमुख जवाहर चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी निर्माण होते. या चौकात वाहतूक पोलीस कर्तव्य बजावतात. परंतु ते गेल्यावर पुन्हा वाहतूक कोंडी निर्माण होते. मंगळवारी दुपारी येथे वाहतूक कोंडी झाली होती. आठवडी बाजाराचा दिवस असल्याने सरासरीपेक्षा वाहतूक अधिक असते. येथून हाकेच्या अंतरावर पोलीस ठाणे आहे हे विशेष.
तुमसर शहराला केवळ एक बायपास रस्ता आहे. सिहोराकडून येताना शहरातूनच जड वाहतूक सर्रास सुरु आहे. पर्यायी बायपास रस्ता नाही. जवाहर चौकात रुग्णालये, बाजाराला जाणारा प्रमुख रस्ता आहे. देव्हाडी मार्ग येथूनच जातो. बँका, नगरपरिषद चौकाजवळ आसहे. शाळा येथून जवळ आहेत. रस्ता निमुळता असल्याने तात्काळ वाहनांची येथे गर्दी होते. सकाळी व सायंकाळी येथे वाहतूक पोलीस तैनात असतात. परंतु ते गेल्यावर नेहमीच वाहतूक कोंडी निर्माण होते. शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु रस्ते मात्र जुनेच आहेत. शहराची रचना जुनीच आहे. रस्ते रुंद करण्याकरिता जागाच नाही. किमान बायपास रस्ता तयार केला तर मुख्य रस्त्यावरची वाहतूक निश्चितच कमी होईल. सायंकाळच्या सुमारास मोठी गर्दी होवून वाहतुकीची कोंडी नेहमीच होते. पोलीस प्रशासनाने येथे दाखल घेण्याची गरज आहे. सामाजिक कार्यकर्ते बालू कटरे यांनी वाहतुकीची कोंडी दूर करण्यची मागणी केली आहे.

शहराचा मुख्य रस्ता व चौक वाहतूक कोंडीमुळे धोकादायक ठरत आहे. श्रीमंत नगरीत सायंकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी जवाहर चौकात होते. बायपास रस्त्याचे मागील अनेक दिवसापासून भिजत घोंगडे सुरु आहे. पोलीस प्रशासनाने येथे दखल घेण्याची गरज आहे.
-प्रा.कमलाकर निखाडे, सामाजिक कार्यकर्ते तुमसर

Web Title: The traffic congestion in the main square of Tumsar city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.