रेल्वेमुळे वाहतुकीची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2016 00:32 IST2016-09-21T00:32:55+5:302016-09-21T00:32:55+5:30

देव्हाडी येथील उड्डाणपुल अंडरपासचे बांधकाम सुरु आहे. निधीअभावी उड्डाणपुलाचे बांधकाम कासवगतीने सुरु आहे.

The traffic congestion due to the railways | रेल्वेमुळे वाहतुकीची कोंडी

रेल्वेमुळे वाहतुकीची कोंडी

निधीअभावी काम संथगतीने : अंडरपासचे काम प्रगतीपथावर
तुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपुल अंडरपासचे बांधकाम सुरु आहे. निधीअभावी उड्डाणपुलाचे बांधकाम कासवगतीने सुरु आहे. रेल्वे क्रॉसिंगसह बायपास रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी दररोज सुरु असून या मार्गावर अपघाताची भिती व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबई हावडा रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ तुमसर- रामटेक - गोंदिया मार्गावर देव्हाडी येथे आहे. वाहतुकीची प्रचंड कोंडी निर्माण होत असल्याने येथे उड्डाणपुल मंजूर करण्यात आले. अडीच वर्षापूर्वी उड्डाणपुल बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. प्रथम बायपास रस्ता तयार करण्यात आला. नंतर देव्हाडीवासी तथा रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या प्रवाशांकरिता अंडरपास पुलाचे बांधकाम सुरु करण्यात आले. आठ ते नऊ महिन्यापूर्वी बायपास रस्त्यावरून वाहतूक सुरु करण्यात आली.
तुमसर - गोंदिया - रामटेक - भंडारा राज्य महामार्ग येथून जातो. प्रचंड रहदारी या रस्त्यावर दररोज आहे. उड्डाणपुल बांधकामाची गती कासगवतीने सुरु आहे. संबंधित कंत्राटदाराचे बिलही येथे थकीत असल्याची माहिती आहे. राज्य शासन व रेल्वे प्रशासन येथे संयुक्तपणे उड्डाणपुलाचे बांधकाम करीत आहे. राज्य शासन बायपास रस्ता, अंडरपास तथा दोन्ही बाजूला -- कामे करणार आहे. तर रेल्वे प्रशासन रेल्वे ट्रॅकवरील उड्डाणपुल सिमेंट बांधकाम करणार आहे. रेल्वे प्रशासनाने अजूनपर्यंत निविदा काढली नाही असे समजते.
४३ कोटींचा हा उड्डाणपुल आहे. २६ कोटी राज्य शासन तर १७ कोटी रेल्वे प्रशासन खर्च करणार आहे. राज्य शासनाचे संबंधित खात्याचे अधिकारी तज्ज्ञांचे येथे पथक येऊन गेले. स्थानिक लोकप्रतिनिधी तथा खासदारांनी येथे लक्ष घालण्याची गरज आहे. कामाचा वेग असाच सुरु राहिला तर किमान उड्डाणपुल निर्माण करण्याकरिता एक दशक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: The traffic congestion due to the railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.