शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वृक्षारोपणावर चालविला ट्रॅक्टर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 21:51 IST

राखीव वन क्षेत्रातील वृक्षारोपणावर ट्रॅक्टर चालवून ५५५ रोपटी उद्ध्वस्त करून वनजमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न करण्याची घटना तालुक्यातील बोरगाव बुज. जंगलातील मेंढा शिवारात घडली. या प्रकरणी वनविभागाने दिलेल्या तक्रारीवरून अकरा जणांना अटक करण्यात आली.

ठळक मुद्देअकरा जणांना अटक : राखीव वनक्षेत्राच्या मेंढा शिवारातील घटना, भारतीय राजमुद्रा गैरवापराचा गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राखीव वन क्षेत्रातील वृक्षारोपणावर ट्रॅक्टर चालवून ५५५ रोपटी उद्ध्वस्त करून वनजमिनीवर अतिक्रमणाचा प्रयत्न करण्याची घटना तालुक्यातील बोरगाव बुज. जंगलातील मेंढा शिवारात घडली. या प्रकरणी वनविभागाने दिलेल्या तक्रारीवरून अकरा जणांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे अतिक्रमण करण्यासाठी आलेल्या व्यक्तींनी पोलिसांसारखा गणवेश घालून भारतीय राजमुद्रेचा गैरवापर केल्याचे वनविभागाने या तक्रारीत म्हटले आहे.आसाराम वैद्य (६५), पंकज आसाराम वैद्य (२५) दोघे रा. मेंढा, हेमकृष्ण तेजराम उईके (३६) रा.कुंभली, केवळराम गुजर उईके (६७) रा.पिटेझरी, वसंत बळीराम इळपाते (६१) रा.ओकारा, जयलाल बळीराम नामुर्ते (३०) रा.एकोडी, दलिराम सदाशिव उईके (३६) रा.रावणवाडी, चैतराम किसन टेकाम (३६) रा.पिटेझरी, केशव शामराव मेश्राम (२८) रा.मकरधोकडा, सेवकराम डुकरू टेकाम (४७) रा.पिटेझरी, रेवनताई सुरेश वरखडे (५५) रा.पिटेझरी अशी कारवाई झालेल्यांची नावे आहेत. वनविभागाच्या वतीने बोरगाव बुज. जंगलातील मेंढा शिवारात महिनाभरापूर्वी दहा हेक्टरवर वृक्षारोपण केले होते. या ठिकाणी ११ हजार १११ वृक्षांचे रोपण करण्यात आले होते. वनविभागाच्या वतीने देखभाल करण्यात येत होती. त्याठिकाणी एका चौकीदाराची नियुक्ती करण्यात आली. मात्र मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आसाराम वैद्य यांच्यासह काही जण ट्रॅक्टरसह या जंगलात पोहचले. आमची जमीन आहे असे म्हणत त्यांनी वृक्षारोपण केलेल्या रोपट्यांची ट्रॅक्टरद्वारे चिखलणी सुरु केली. यात ५५५ रोपटी उध्वस्त झाली.हा प्रकार माहित होताच वनचौकीदार त्या ठिकाणी पोहचला. त्याने याबाबत जाब विचारला असता आम्हाला सरकारने परवानगी दिली आहे. ही जागा आमची आहे असे म्हणत त्या चौकीदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. दुपारी ४ वाजेपर्यंत हा प्रकार सुरु होता. वनविभागाचे वनरक्षक आणि अधिकारी त्याठिकाणी पोहचले. त्यांनी या मंडळींना अटकाव करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी मारण्याची धमकी दिली.ही सर्व मंडळी पोलिसांसारखा खाकी गणवेश घालून आणि त्यावर भारतीय राजमुद्रा लावून आलेले होते. या ठिकाणी त्यांनी चिखलणी करताना ‘वन, जल, जमीन हमारी है, उसपर हमारा अधिकार है’ अशा घोषणा दिल्या.विशेष म्हणजे महिनाभरापूर्वीही अतिक्रमणाचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी वनविभागाच्या वतीने कारधा पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती. दरम्यान पुन्हा काल ही मंडळी मेंढा शिवारात पोहचली. त्यांनी तेथे गोंधळ घालत वृक्षारोपण नष्ट केले.त्यावरून वनपरिक्षेत्राधिकारी निलय भोगे यांनी कारधा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून भादंविच्या विविध कलमांसह भारतीय वनअधिनियम आणि भारतीय राजमुद्रा अयोग्य वापरास प्रतिबंध कायद्याच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला. कारधा पोलिसांनी या अकरा जणांना ताब्यात घेऊन अटक केली. या घटनेने वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.