ट्रॅक्टर उलटला; बालकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 30, 2017 00:32 IST2017-06-30T00:32:06+5:302017-06-30T00:32:06+5:30

आंधळगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सालेबर्डी जवळील तलावाजवळ ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात

Tractor overturned; Child's death | ट्रॅक्टर उलटला; बालकाचा मृत्यू

ट्रॅक्टर उलटला; बालकाचा मृत्यू

सालेबर्डी येथील घटना : आईवडिलांना एकुलता
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहाडी : आंधळगाव पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या सालेबर्डी जवळील तलावाजवळ ट्रॅक्टर उलटल्याने झालेल्या अपघातात साहिल अरुण डोये (१३) याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दुसरा मुलगा गंभीर जखमी झाल्याची चर्चा आहे. साहिल हा आई वडिलांना एकुलता होता. ही घटना गुरूवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली आहे.
साहिल डोये (१३) वर्ष हा जि.प. पूर्व माध्य. शाळा सकरला येथे ७ व्या वर्गात शिकत होता. तो मामाचे गाव सालेबर्डी वडेगाव येथे गेला होता. सकाळी साहिल हा ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३६ - ५७१ ने नवेगाव येथून सालेबर्डी कडे जात होता.
साहिल हा इंजिनच्या बाजुच्या सिटवर बसला होता. सालेबर्डी कालव्याच्या पाळीवरून ट्रॅक्टर जात असताना त्याचे संतुलन बिघडल्याने ट्रॅक्टर उलटला. त्यात साहिल दाबल्या गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. अपघातात ट्रॅक्टर हा १७ वर्षीय मुलगा विशाल सार्वे चालवित असल्याची माहिती आहे. मात्र तक्रारीत वासुदेव देवा फुंडे हा चालक असल्याचे नमुद करण्यात आले आहे.
या घटनेत विशाल सार्वे हा गंभीर जखमी झाला असून त्याला सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
साहिल हा आपल्या आई वडिलांना एकुलता असल्याने गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आंधळगाव पेलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Tractor overturned; Child's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.