ट्रॅक्टरला इंडिकाची धडक; एक ठार

By Admin | Updated: June 4, 2016 00:17 IST2016-06-04T00:17:35+5:302016-06-04T00:17:35+5:30

उभ्या ट्रॅक्टरला एका चारचाकी वाहनाने धडक दिली यात एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले.

Tractor hits Indica; One killed | ट्रॅक्टरला इंडिकाची धडक; एक ठार

ट्रॅक्टरला इंडिकाची धडक; एक ठार

तुमसर : उभ्या ट्रॅक्टरला एका चारचाकी वाहनाने धडक दिली यात एकाचा मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झाले. हा अपघात तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर एलोरा पेपर मिलजवळ बुधवारी सायंकाळी ७.१५ वाजता घडला.
मृतकाचे नाव दामोधर दामले (८०) रा. पंचशीलनगर नागपूर असे आहे तर गंभीर जखमींचे नावे पवन किशोर मेश्राम (४५), शैलेश टेंभेकर (३०), इंडिका चालक निखिलेश निकोसे (३६) सर्व रा. पंचशीलनगर नागपूर असे आहे. इंडिका एम एच ३१ सी.एन. १०५९ गोंदियावरुन नागपूरकडे जातांनी हा अपघात तुमसर - गोंदिया राज्य मार्गावर घडला. सर्वजण गोंदिया येथे मृत दामोधर दामले यांच्या उपचाराकरिता गेले होते. एलोरा पेपर मिल देव्हाडा शिवारात रस्त्यावर एक ट्रॅक्टर उभा होता. उभ्या ट्रॅक्टरला चारचाकीने धडक दिली. घटनास्थळीच दामोधर दामले यांचा मृत्यू झाला. गंभीर जखमीवर तुमसर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. तिनही गंभीर जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. तुमसर - गोंदिया राज्य महामार्ग मृत्यूमार्ग ठरत असून वाहतूक पोलीस व उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या कार्यप्रणालीवर येथे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Web Title: Tractor hits Indica; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.