रेल्वे फाटकावरील ट्रॅक धोकादायक
By Admin | Updated: October 5, 2015 00:56 IST2015-10-05T00:56:55+5:302015-10-05T00:56:55+5:30
तुमसर रोड येथे दोन महिन्यापूर्वी मेगा ब्लॉक दरम्यान रेल्वे फाटकावरील रुळ समतल केला. यावर रेल्वे प्रशासनाने गिट्टी टाकली.

रेल्वे फाटकावरील ट्रॅक धोकादायक
अपघाताची शक्यता : रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष
तुमसर : तुमसर रोड येथे दोन महिन्यापूर्वी मेगा ब्लॉक दरम्यान रेल्वे फाटकावरील रुळ समतल केला. यावर रेल्वे प्रशासनाने गिट्टी टाकली. सध्या ही गिट्टी मुरुमातून बाहेर आली आहे. यावर रेल्वे प्रशासनाने डांबरीकरण केले नसल्ययाने हा रेल्वे ट्रक धोकादायक ठरले असून वाहनांना अडथळा निर्माण होत आहे.
तुमसर रोड येथे रेल्वे फाटक क्रमांक ५३२ वर दोन महिन्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने मेगा ब्लॉक केला होता. तुमसर-गोंदिया, रामटेक या राज्य महामार्गावर हे रेल्वे फाटक आहे. मेगा ब्लॉक दरम्यान रेल्वे रुळ समतल करण्यात आले. रेल्वे रुळाभोवती गिट्टी घालणे अनिवार्य असते. रेल्वे प्रशासनाने गिट्टी घातल्यानंतर त्यावर मुरुम घालून तिला दाबले. वाहनांची प्रचंड वर्दळ येथे सतत राहत असल्याने मुरुम निघून गेले. सध्या गिट्टी तेवढी शिल्लक आहे. येथे दोन ट्रॅक उंच असल्याने गिट्टीतून वाहन चालवितांनी कमालीचा त्रास होतो.अनेकांची वाहने बंद पडतात.
वाहनाच्या टायरमुळे बंदुकीच्या गोळीसारखी गिट्टी फेकल्या जाते. पावसाळा हे कारण रेल्वे प्रशासनाने येथे पुढे केले आहे. परंतु मागील एक महिन्यापासून पावसाचा येथे पत्ता नाही.
अनेक पादचारी या गिट्टीमुळे जखमी झाले आहे. रेल्वे प्रशासनाचे येथे दुर्लक्ष दिसून येत आहे. निदान पुन्हा तात्पुरते मुरुम घालून उखडलेली गिट्टी दाबण्याची गरज आहे. महत्वपूर्ण रेल्वे फाटकाकडे येथे दुर्लक्ष केल्या जात आहे.
वारंवार फाटक बंद होणाऱ्या क्रमामुळे वाहनांच्या प्रचंड रांगा लागतात. फाटक उघडल्यावर या गिट्टीवजा ट्रॅकमुळे कमालीचा मन:स्ताप सहन करावा लागतो. (तालुका प्रतिनिधी)