पर्यटक म्हणतात, कोका अभयारण्यात ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:29+5:30

विधानसभा निवडणुकीच्या काळात मी पुन्हा येईल हा शब्द अगदी परवलीचा झाला होता. राजकीय नेत्यांकडून याचा उच्चार वारंवार झाला. सोशल मीडियावरही हे वाक्य वारंवार पाहायला मिळाले. त्यामुळे आता कोणत्याही प्रसंगात मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, असे गमतीने का होईना म्हटले जात आहे. याचाच प्रत्यय ठिकठिकाणी येत आहे.

Tourists say 'I will come again, I will come again' at Coca Sanctuary | पर्यटक म्हणतात, कोका अभयारण्यात ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल’

पर्यटक म्हणतात, कोका अभयारण्यात ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल’

Next
ठळक मुद्देअभिप्राय पुस्तिकेत केली नोंद । राजकीय घडामोडींचा पर्यटनावर प्रभाव

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल’ हे वाक्य विधानसभेच्या निवडणुकीत राज्यभर गाजले. राजकीय घडामोडींचा जनमानसांवर कसा परिणाम पडतो याचे उत्तम उदाहरण कोका अभयारण्यातील अभिप्राय पुस्तिकेत दिसून आला. अभयारण्यातील वनवैभव पाहून तृप्त झालेल्या एका पर्यटकाने चक्क चालू राजकीय घडामोडीवरच अगदी मोजक्या शब्दात आपला शेरा नोंदविला.
विधानसभा निवडणुकीच्या काळात मी पुन्हा येईल हा शब्द अगदी परवलीचा झाला होता. राजकीय नेत्यांकडून याचा उच्चार वारंवार झाला. सोशल मीडियावरही हे वाक्य वारंवार पाहायला मिळाले. त्यामुळे आता कोणत्याही प्रसंगात मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल, असे गमतीने का होईना म्हटले जात आहे. याचाच प्रत्यय ठिकठिकाणी येत आहे. कोका अभयारण्याला एका पर्यटकाने भेट दिली. अलीकडे कोका अभयारण्य व्याघ्र दर्शनाने चर्चेत येत आहे. येथील वनवैभव कुणालाही मोहित करणारे आहे. जंगल सफारी करून आल्यानंतर पर्यटकांना अभिप्राय पुस्तकात शेरा लिहिण्याची विनंती केली जाते. अभयारण्याबद्दल काय वाटले हे लिहिणे अपेक्षित असते. एका पर्यटकाने जंगल सफारी करून दिलेला अभिप्राय कोका अभयारण्याच्या वैभवात खऱ्या अर्थाने भर घालणाराच म्हणावा लागेल. ‘मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल’ असा शेरा लिहून सदर पर्यटकाने अगदी मार्मिक शब्दात कोका अभयारण्याचे वर्णन केले. हा शेरा आता चर्चेचा विषय झाला.

भंडारा जिल्ह्यात कोका अभरण्यातील निर्मिती १८ जुलै २०१३ रोजी करण्यात आली. शंभर चौरस किमीवर पसरलेल्या या अभयारण्यात वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, चांदी अस्वल असे वन्यजीव आहेत. सुमारे हजार प्रजातीच्या वनस्पती असून नैसर्गीक तलाव आहेत. जागो जागी डोंगरदºया असून पर्यटकांसाठी वन्यजीव विभागाने येथे विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. दररोज सकाळी आणि दुपारी जंगल सफारीचे आयोजन केले जाते. गत आठवड्यात दोनदा व्याघ्र दर्शन झाल्याने हे अभयारण्य आता चर्चेत आले आहे.

Web Title: Tourists say 'I will come again, I will come again' at Coca Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.