कोका वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांची झुंबड

By Admin | Updated: April 23, 2017 00:45 IST2017-04-23T00:45:03+5:302017-04-23T00:45:03+5:30

सन २०१३ मध्ये निर्मित भंडारा जिल्ह्याचे एकमेव कोका वन्यजीव अभयारण्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे १६००

Tourist spots in Coca Wildlife Sanctuary | कोका वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांची झुंबड

कोका वन्यजीव अभयारण्यात पर्यटकांची झुंबड

१६०० पर्यटकांची भेट : जानेवारी ते मार्च मध्ये ९० हजारांचा महसूल
युवराज गोमासे   करडी (पालोरा)
सन २०१३ मध्ये निर्मित भंडारा जिल्ह्याचे एकमेव कोका वन्यजीव अभयारण्यात जानेवारी ते मार्च या तीन महिन्याच्या कालावधीत सुमारे १६०० पर्यटकांनी पर्यटन केले असून सुमारे ९० हजाराचा महसूल प्राप्त झाला आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कोका वनविश्रामगृह, बाग बगीचे, बांबूच्या कुट्या, मचानी, पानवठे, चांगले रस्ते, राहण्याच्या व जेवणाच्या सुविधा उपलब्ध झाल्याने पर्यटकांच्या संख्येत मागील तीन वर्षांच्या तुलनेत वाढ झालेली आहे. ‘अल्ला’ वाघणीचे तीन छावे अभयारण्याची शान ठरले आहेत.
कोका वन्यजीव अभयारण्य भंडारा शहरापासून सुमारे १५ कि.मी. अंतरावर आहे. भंडारा बसस्थानक व भंडारा रोड रेल्वे स्टेशन (२५ कि.मी.) हे जवळचे ठिकाण असून मोटारमार्गाने अभयारण्यात पोहचता येते. अभयारण्याचे मुख्य प्रवेशद्वार चंद्रपूर (कोका) येथे असून पर्यटकांना येथे बुकींग सुविधा उपलब्ध आहे. तसेच आॅनलाईन बुकींग सुविधा सुद्धा आहे. भंडारा शहरापासून पूर्वेला राष्ट्रीय महामार्गाने पलाडी तसेच शिंगोरी फाट्यावरून आमगाव, टेकेपार मार्गे येथे पोहचता येते. खासगी वाहनांची सुविधा भंडारा शहरातून उपलब्ध राहते. पर्यटकांना राहण्यासाठी कोका येथे वातानुकुलीत व अत्याधुनिक सोयी सुविधांनी युक्त तसेच शौचालय, स्नानगृह, स्वतंत्र किचन व्यवस्था असे इंग्रजकालीन वनविश्रामगृह, भंडारा येथे शासकीय विश्रामगृह तसेच भंडारा शहरात खासगी हॉटेल स्वस्त दरात उपलब्ध आहेत. तुमसर व साकोली शहरातूनही राज्यमार्ग २७१ मार्गे येथे पोहचता येत असून बसस्थानक कोका व पालोरा हे थांबे आहेत.
सौरउर्जेवर पानवठे असून पक्षी निरीक्षक करण्यासाठी मचानीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर अन्य पाणवठ्यांवर असून प्राण्यांच्या हालचाली जवळून पाहता येतात. जंगलात फिरण्यासाठी चांगले व चढउताराचे मार्ग तयार करण्यात आले आहेत. पर्यटन वाढीसाठी अभयारण्य प्रशासनाचे पर्यटन वाहनांची सोय उपलब्ध करून देण्यात येते. अभयारण्यात सकाळी ६ ते ११ वाजता पर्यंत तसेच सायंकाळी ३ ते ६ वाजतापर्यंत फेरफटका मारता येते. सायंकळी ७ वाजतापासून अभयारण्य पर्यटकांसाठी बंद असतो. तसेच रोज सायंकाळी ७ वाजतानंतर तुमसर ते साकोली राज्यमार्ग २७२ तसेच कोका ते शिंगोरी मार्ग बंद केला जातो. कोका अभयारण्य आठवड्याला प्रत्येक शुक्रवारी बंद असतो. कोका प्रादेशिक वनविभागाचे वतीने पर्यटकांना आकर्षीत करण्यासाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. चांगले बगीचे, मुलींसाठी झुले, बांबूचे हट, राहुट्या आदी व्यवस्था तयार करण्यासाठी वेगाने काम सुरु आहेत.

Web Title: Tourist spots in Coca Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.