विदेशी पर्यटकांचा अभ्यास दौरा

By Admin | Updated: December 28, 2016 02:08 IST2016-12-28T02:08:51+5:302016-12-28T02:08:51+5:30

स्थानिक जगन्नाथ मंदिर परिसरात चार दशकापूर्वी केलेल्या उत्खननात २००० वर्षापूर्वीचे भव्य बौद्ध स्तुप सापडले होते.

Touring foreign tourists | विदेशी पर्यटकांचा अभ्यास दौरा

विदेशी पर्यटकांचा अभ्यास दौरा

जगन्नाथ स्तुपाची पाहणी : ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा
पवनी : स्थानिक जगन्नाथ मंदिर परिसरात चार दशकापूर्वी केलेल्या उत्खननात २००० वर्षापूर्वीचे भव्य बौद्ध स्तुप सापडले होते. उत्खननात सापडलेले बौद्ध संस्कृतीची माहिती दर्शविणारे अवशेष नागपूर, मुंबई येथील पुरातन वस्तू संग्रहालयात पाठविले असले तरी संरक्षित जागेवर दगडी खांब विखुरलेले आहेत. पालीभाषेत कोरलेले वाक्य वाचून बौद्ध संस्कृतीची माहिती मिळविण्याच्या उद्देशाने विदेशी पर्यटकांनी अभ्यास दौरा केला व स्तुपाच्या अवशेषांची पाहणी केली.
बँकांक, थायलंड येथील अधिव्याख्याता नॅटबापोल सीरीसवाद, पिटर स्कीलींग, डेक्कन कॉलेज पुणे येथील पुरातत्व विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ.भास्कर देवतारे व भारतीय पुरातत्व विभागाचे वरिष्ठ संरक्षण सहाय्यक हेमंत हुकरे यांनी उत्खननाचे जागेवर विखुरलेले दगडी खांब, त्यावर पाली भाषेत कोरलेले वाक्य वाचून बौद्ध संस्कृतीविषयी अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी ऐतिहासिक परकोट, हरदोलालाची टेकडी, सुलेमान टेकडी, या स्थळांना भेट देवून अभ्यासदौरा पूर्ण केला.
माध्यम प्रतिनिधी सोबत संवाद साधताना प्रा.नॅटचापोल सीरीसवाद यांनी २००० वर्षापूर्वीचा मौल्यवान ठेवा पर्यटकांसाठी खुला करून त्याचा प्रचार व प्रसार व्हावा या स्थळी उत्खननात सापडलेले सर्व साहित्य पवनी येथे पुरातिन वस्तू संग्रहालय उभारून परत आणावे व शासन व नागरिक यांच्या सहकार्याने पर्यटनस्थळांचा विकास व्हावा अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी जिल्हा दुग्ध उत्पादक संघाचे माजी अध्यक्ष विलास काटेखाये, माजी नगराध्यक्ष डॉ.प्रकाश देशकर, राम भेंडारकर, विजय ब्राम्हणकर व मैत्र संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Touring foreign tourists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.