कंटेनरचा वीज तारांना स्पर्श

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2018 22:30 IST2018-11-02T22:30:02+5:302018-11-02T22:30:28+5:30

रेल्वे ट्रॅक पार करताना कंटेनरचा रॉड उच्चदाब वीज वाहिणीच्या संपर्कात आल्याने दोनदा मोठा स्फोट झाला. कंटेनरचा टायर फुटला. सुदैवाने प्राणहानी टळली. ही घटना तुमसर गोंदिया मार्गावर देव्हाडी येथे घडली.

Touch the power wire of the container | कंटेनरचा वीज तारांना स्पर्श

कंटेनरचा वीज तारांना स्पर्श

ठळक मुद्देमोठा स्फोट : रेल्वे ट्रॅकवरील उच्चदाब वाहिणी

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर: रेल्वे ट्रॅक पार करताना कंटेनरचा रॉड उच्चदाब वीज वाहिणीच्या संपर्कात आल्याने दोनदा मोठा स्फोट झाला. कंटेनरचा टायर फुटला. सुदैवाने प्राणहानी टळली. ही घटना तुमसर गोंदिया मार्गावर देव्हाडी येथे घडली.
तुमसर गोंदिया मार्गावर चौपदरीकरणाच्या कामाकरिता तिरोडा येथे जाणाऱ्या कंटेनरमधील मोठ्या मशीनचा लोखंडी रॉड उच्चदाब वीज वाहिण्यांना घासत गेला. तात्काळ मोठा स्फोट झाला. दोन स्फोटांमुळे वाहतुकदारात मोठी खळबळ उडाली. ट्रकचा टायर फुटला. कंटेनर वाहक ट्रकमधून बाहेर फेकला गेला. कंटेनर मधील मोठी मशीन काळी पडली. सुदैवाने यात प्राणहानी टळली. वीज वाहिन्या काही प्रमाणात वाकल्या. रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन डाऊन मार्गावरील वीज वाहिन्या दुरुस्त केला. कंटेनर चालकाला ताब्यात घेऊन रेल्वे अधिनियमानंतर्गत कारवाई करण्यात आली.
मुंबई हावडा रेल्वे मार्ग अतिशय व्यस्त मार्ग असून काही काळ या मार्गावरील रेल्वेसेवा प्रभावित झाली होती. रेल्वेच्या इलेक्ट्रीक विभागाने वीज तारांची दुरुस्ती केली. देव्हाडी रेल्वे फाटकाच्या दोन्ही बाजूला सुरक्षेकरिता आडवे लोखंडी खांब लावले आहे. खांबाखालून गेलेला जड वाहतूक ट्रक सुरक्षित मानला जातो. वीज तारांना स्पर्श होऊ नये इतक्या उंचावर ते खांब आहे. सदर कंटेनर रेल्वे तारांमधून गेले. कंटेनरचा वीज तारांना स्पर्श झाला. रेल्वे ट्रॅकमधील वीज तारा लोंबकळत आहेत काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. या प्रकाराने कंटेनरमधील लाखो रुपयाची मशनरी निकामी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.

Web Title: Touch the power wire of the container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.