कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येत ३०३ने वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST2021-07-14T04:40:34+5:302021-07-14T04:40:34+5:30
भंडारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली असून, रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. दरम्यान, मंगळवारी कोविड पोर्टल सिंक्रोनाइज ...

कोरोना रुग्णांच्या एकूण संख्येत ३०३ने वाढ
भंडारा जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली असून, रुग्णांची संख्याही वेगाने कमी होत आहे. दरम्यान, मंगळवारी कोविड पोर्टल सिंक्रोनाइज झाले. त्यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यातील माहिती समाविष्ट झाल्याने कोरोना रुग्णांची संख्या ३०३ ने वाढली आहे. विशेष म्हणजे कोरोना संसर्गाची दुसरी लाट या दोन महिन्यात सर्वाधिक होती. आता जिल्ह्याची रुग्णसंख्या ५९ हजार ७९५ झाली आहे. त्यात भंडारा तालुका २४ हजार ८५९, मोहाडी चार हजार ४००, तुमसर सात हजार १८८, पवनी सहा हजार ६३, लाखनी सहा हजार ६११, साकोली सात हजार ७११ आणि लाखांदूर तालुक्यात दोन हजार ९६३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले होते. यापैकी ५८ हजार ६५९ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, ११३० व्यक्तींचा कोरोनाने बळी घेतला आहे.
जिल्ह्यात आता केवळ सहा ॲक्टिव्ह रुग्ण असून, त्यात साकोली तीन, लाखनी दोन आणि पवनी तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर आणि लाखांदूर तालुक्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या निरंक झाली आहे.
बॉक्स
५८ हजार ६५९ कोरोनामुक्त
जिल्हा कोरोनामुक्तीकडे वाटचाल करीत असून, आतापर्यंत ५८ हजार ६५९ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यात भंडारा तालुक्यातील २४ हजार ३४२, मोहाडी चार हजार ३०२, तुमसर सात हजार ५९, पवनी पाच हजार ९५०, लाखनी सहा हजार ५१०, साकोली सात हजार ६०३ आणि लाखांदूर तालुक्यातील दोन हजार ८९३ व्यक्तींचा समावेश आहे.