शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

By Admin | Updated: June 14, 2015 01:50 IST2015-06-14T01:50:45+5:302015-06-14T01:50:45+5:30

१५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमजाळात अडकवून एका शिक्षकाने दोन वर्षापासून तिचे लैंगिक शोषण केले.

Torture on teacher's student | शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

शिक्षकाचा विद्यार्थिनीवर अत्याचार

जांभोरा येथील घटना : शिक्षकाला अटक
मोहाडी : १५ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमजाळात अडकवून एका शिक्षकाने दोन वर्षापासून तिचे लैंगिक शोषण केले. ही घटना जांभोरा येथे उघडकीस आल्यानंतर या प्रेमवीर शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
सरस्वती विद्यालय जांभोरा येथील गणित व विज्ञान शाखेचा शिक्षक हेमराज मेश्राम (४४) या विवाहित शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीला प्रेमजाळात ओढले व तिच्यावर एप्रिल २०१३ पासून लैंगिक अत्याचार करीत होता. पिडीत मुलगी पैसे व भेटवस्तूच्या मोहापायी त्या शिक्षकाच्या अत्याचाराला बळी पडत राहिली. या प्रकरणाची माहिती पीडित मुलीच्या आईला होताच तिने त्या शिक्षकाविरुद्ध मोहाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर मोहाडी पोलिसांनी हेमराज मेश्रामाविरुद्ध भादंवि ३७६ व बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी हे करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Torture on teacher's student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.