शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

तुडतुडा, अतिवृष्टीने धानपिकाला मारले तर भाजीपाल्याने सावरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 05:01 IST

जानेवारी महिन्यात प्रथम अवकाळी पावसाने हजेरी लावली अवकाळी पावसाचा हा सातत्य पण फेब्रुवारी व मार्च महिन्यात ही कायम होता दोन महिने थोडा फार कमी जास्त प्रमाणात त्याचा फटका सहन करावा लागला असला तरी पुन्हा एकदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या नैसर्गिक संकटाला पुन्हा एकदा तोंड द्यावे लागले ऑगस्ट महिन्याच्या २८, २९ व ३० रोजी आलेल्या महापुराने अक्षरशः जीवन ढवळून निघाले. नदीकाठावरील तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले याचा सर्वात जास्त फटका पिकांनाही बसला.

ठळक मुद्देसरते वर्ष, ढासळलेल्या अर्थव्यवस्थेला कृषी क्षेत्राचा आधार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  कोरोना महामारी ने संपूर्ण जग हादरून गेले असताना त्यात जगाचा पोशिंदा असलेला बळीराजालाही प्रचंड फटका सहन करावा लागला. आधीच अस्मानी संकट डोक्यावर असताना सुलतानी संकटाने ही बळीराजाला चांगलेच पछाडले.  जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत कधी अवकाळी पाऊस तर कधी अतिवृष्टी तर कधी कीड व रोग यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. अशातच धानाचे नुकसान सोसावे लागले थोड्या प्रमाणात का असेना शेवटच्या दोन महिन्यात भाजीपाला पिकांचे उत्पादन बऱ्यापैकी निघाल्याने शेतकऱ्यांना मदत झाली. सरत्या वर्षात कृषी व व त्याच्याशी संबंधित असलेल्या घडामोडींवर नजर घातल्यास शेतकऱ्यांसाठी व भाजीपाला उत्पादकांसाठी हा वर्ष तेवढा फारसा चांगला म्हणता येणार नाही.जानेवारी महिन्यात प्रथम अवकाळी पावसाने हजेरी लावली अवकाळी पावसाचा हा सातत्य पण फेब्रुवारी व मार्च महिन्यात ही कायम होता दोन महिने थोडा फार कमी जास्त प्रमाणात त्याचा फटका सहन करावा लागला असला तरी पुन्हा एकदा ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात आलेल्या नैसर्गिक संकटाला पुन्हा एकदा तोंड द्यावे लागले ऑगस्ट महिन्याच्या २८, २९ व ३० रोजी आलेल्या महापुराने अक्षरशः जीवन ढवळून निघाले. नदीकाठावरील तसेच सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले याचा सर्वात जास्त फटका पिकांनाही बसला. भाजीपाला पिके ही उदध्वस्त झाली. हजारो हेक्टरमधील शेती पाण्याखाली आल्याने धान्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी धान अक्षरशः जमीनदोस्त झाले.दुसरीकडे मार्च महिन्यापासून राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाला.  त्यामुळे अशा भीतीमध्येही शेतकऱ्यांचा भाजीपाला नासाडी होऊ नये यासाठी कृषी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोणत्याही सुविधा नसतानाही कोरणा योद्धा म्हणून आपत्ती काळात आपली सेवा बजावली. यामध्ये काहींना मृत्यूचा सामना करावा लागला तर काहींना कोरोना बाधित व्हावे लागले. मात्र तरीही न डगमगता बळीराजा सह अनेकांनी आपले योगदान दिले.  यावर्षी नैसर्गिक संकटांनी ही बळीराजाला पुरते हैराण करून सोडले. मात्र अशाही संकटात सकारात्मक विचार करून भाजीपाला लागवड केलेल्या शेतकऱ्यांना भाजीपाल्याने तारले असे म्हणायला हरकत नाही. भंडारा तालुक्यातील चिखली येथील शेतकरी तानाजी गायधने यांनी बोलताना सांगितले की वरुणाने बळीराजालाही एक नवा धडा दिला आहे. आजपर्यंत शेतकरी कोणतेही नियोजन करत नव्हते मात्र आता आपण शेतकरी बचत गट, उत्पादक कंपन्यांच्यामार्फत आंतरराज्य तसेच इतर जिल्ह्यात दर्जेदार शेतमाल विक्री करू शकतो हे शिकलो.  लाखनी तालुक्यातील गोंडेगाव येथील शेतकरी उमेश गरपडे म्हणाले, बाजारपेठेचा अभ्यास करून नफा-तोटा लक्षात घेत वर्तमानात शेती करणे महत्त्वाचे आहे. पावसाळ्याच्या दिवसात भाजीपाल्याची शेती केल्यास निश्चितच अधिक पैसे मिळतात. धानाच्या शेतीला खर्च अधिक व नफा कमी अशी परिस्थिती जिल्हावाशी आपण अनुभवुन आहोत. तेव्हा पावसाळ्यात धानाची शेती कमी करून भाजीपाल्याची शेती करा, असे ते म्हणाले.

बळीराजासह कृषी कर्मचारीच खरे कोरोना योद्धे  कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असताना शासनाकडून कोणत्याही सुविधा मिळाल्या नसतानाही अशा संकटात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कृषी विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी कोरोना योद्धा म्हणून आपत्ती काळात आपली सेवा बजावली.  राज्यात सर्वाधिक मृत्यू कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचे झाले तर अनेकांना कोरोना बाधित व्हावे लागले. 

अतिवृष्टी, महापुर, तुडतुड्याचा फटका जिल्ह्यात २८,२९,३० ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टी, महापुर आणि तुडतुड्याने  धान पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. जिल्ह्यात अतिवृष्टी आणि महापुराने २६ हजार ८१२ हेक्टर पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा फटका ३८  हजार९३१ शेतकऱ्यांना बसला होता. जिल्ह्यात खरीप हंगामात एक लाख ८५ हजार ८५४ हेक्टरवर धानाजी लागवड करण्यात आली होती. खरीप हंगामात जिल्ह्यातील एक लाख ८३ हजार ४०११ शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेत सहभाग नोंदवला होता. 

 

टॅग्स :floodपूरagricultureशेती