दिव्यांग स्पर्धेत तुमसरची मतिमंद विद्यार्थिनी अव्वल
By Admin | Updated: February 29, 2016 00:24 IST2016-02-29T00:24:07+5:302016-02-29T00:24:07+5:30
सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन व अपंग कल्याण आयुक्तालय पुणे तसेच प्रभाकर दटके स्मृती प्रतिष्ठान नागपूरच्या ...

दिव्यांग स्पर्धेत तुमसरची मतिमंद विद्यार्थिनी अव्वल
लुंबिनी मतिमंद शाळा तुमसर येथील विद्यार्थी
तुमसर : सामाजिक न्याय विभाग महाराष्ट्र शासन व अपंग कल्याण आयुक्तालय पुणे तसेच प्रभाकर दटके स्मृती प्रतिष्ठान नागपूरच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित अपंगाच्या दिव्यांगच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत मतिमंद प्रवर्गातून लुंबिनी मतिमंद मुला-मुलीची कर्मशाळा तुमसरची विद्यार्थी २०० मी धावणे स्पर्धेत राज्यात अव्वल ठरली आहे.
संगीता शालिक माटे असे प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या मतिमंद विद्यार्थीनीचे नाव आहे. रेशिम बाग नागपूर येथे आयोजित दिव्यांग अपंगाच्या स्पर्धेत प्रत्येक प्रवर्गातील राज्यभरातून अडीच हजार अपंग दिव्यांग विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता.
अपंगाच्या मतिमंद प्रवर्गातूनही विविध जिल्ह्याचे विद्यार्थी स्पर्धेत उतरले होते. त्यात २०० मी धावणे या स्पर्धेत संगीता माटे या विद्यार्थिनीने कमी वेळात फिनिश लाईन गाठून प्रथम क्रमांक पटकाविला.
तिच्या या यशाबद्दल शाळेचे प्राचार्या ममता बांगरे, उपप्राचार्य प्रीती रिनायत गृहपाल दिनेश देशभ्रतार उमेशसिंह पंडेल, निता ढेकवार, सचिन मेश्राम व इतर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले. (शहर प्रतिनिधी)