शौचालये ठरली नावापुरतीच
By Admin | Updated: November 25, 2014 22:50 IST2014-11-25T22:50:21+5:302014-11-25T22:50:21+5:30
जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता स्वच्छतागृह व शौचालये तयार करण्यात आली. मात्र बहुतांश शाळांमधील शौचालय बंद अवस्

शौचालये ठरली नावापुरतीच
वापरच नाही : शाळांमधील शौचालये घाणीच्या विळख्यात
भंडारा : जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता स्वच्छतागृह व शौचालये तयार करण्यात आली. मात्र बहुतांश शाळांमधील शौचालय बंद अवस् थेतच असून शौचालयांचा वापरच होत नाही. परिणामी शाळांमधील ही शौचालये नावापुरतीच असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे .जिल्हा परिषद व खासगी शाळांमध्ये सर्व विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळांमधील विद्यार्थ्यांना शौचासाठी बाहेर जावे लागू नये म्हणून शिक्षण विभागाने शाळांमध्ये शौचालय निर्मितीचे निर्देश दिले होते. त्यानुसार बहुतांश शाळांनी विद्यार्थ्यांच्या सुविधेकरिता शाळेत शौचालयांची व स्वच्छतागृहांची उभारणीही केली. तथापि बहुतांश शाळांमध्ये बोअरवेलला पाणी येत नसल्याने तर काही ठिकाणी शाळेत शिपाई नसल्याने या शौचालय व स्वच्छतागृहांची स्वच्छता करणार तरी कोण, म्हणून शौचालयाचा वापरच केला जात नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक शाळांमधील शौचालयांचा आता वापरच होत नसल्याने ते बंद अवस्थेत दिसत आहे. काही शाळांमध्ये पाण्याची कमतरता आहे. त्यामुळे पाण्याअभावी विद्यार्थी शौचालयाचा उपयोग घेऊ शकत नाही. त्यामुळे शाळांमधील शौचालये नावापुरतीच उरल्याचे चित्र सर्वत्र निर्माण झाले आहे. यावर्षी अत्यल्प पावसामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी खोल जात आहे.
पाणी खोल गेल्याने अनेक शाळांमधील बोअरवेल आताच बंद पडलेले आहे. परिणामी शौचालयाकरिता पाणी कोठून आणायचे असा प्रश्न शाळांसमोर पडला आहे. (प्रतिनिधी)