पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजन समितीची आज सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 21:59 IST2019-01-16T21:59:28+5:302019-01-16T21:59:46+5:30
जिल्हा नियोजन समितीची सभा १७ जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजन समितीची आज सभा
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : जिल्हा नियोजन समितीची सभा १७ जानेवारी रोजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा परिषदेच्या सभागृहात दुपारी १ वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत ७ सप्टेंबर रोजी झालेल्या नियोजन समितीच्या सभेचे इतिवृत्त कायम करणे, इतिवृत्तावरील कार्यवाही मुद्यांच्या अनुपालन अहवालास मंजूरी देणे, जिल्हा वार्षिक नियोजन २०१९-२०अंतर्गत सर्व साधारण योजना, आदिवासी उपाययोजना, क्षेत्रबाह्य योजना व अनुसूचित जाती उपाययोजनेचा पारुप आराखड्यास मंजूरी देण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजना २०१८-१९ अंतर्गत सर्वसाधारण योजना, अनुसूचित जाती उपाययोजना, आदिवासी उपाययोजनाच्या (ओटीएसपी) डिसेंबर २०१८ अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेणे, पुर्नविनियोजन प्रस्तावाच मंजूरी प्रदान करणे, जिल्हा नियोजन समितीची मान्यता घेण्याकरिता विभागानी प्रस्ताव, आराखडा मान्यतेस्तव सादर करणे आदी विषयांचा समावेश आहे.