जिल्हा परिषदेत आज जागर स्वच्छतेचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 23:09 IST2019-01-14T23:09:07+5:302019-01-14T23:09:19+5:30

राज्यात सुरू असलेल्या स्वच्छतेचा जागर या उपक्रमांतर्गत येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवार १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हभप सर्जेराव महाराज देशमुख मार्गदर्शन करणार आहेत.

Today, in the Zilla Parishad, Jagar is cleanliness | जिल्हा परिषदेत आज जागर स्वच्छतेचा

जिल्हा परिषदेत आज जागर स्वच्छतेचा

ठळक मुद्देबैठकीचे आयोजन : सर्जेराव महाराजांचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्यात सुरू असलेल्या स्वच्छतेचा जागर या उपक्रमांतर्गत येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात मंगळवार १५ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी हभप सर्जेराव महाराज देशमुख मार्गदर्शन करणार आहेत.
जिल्ह्यात राबविण्यात येणाºया स्वच्छतेचा जागर या उपक्रमाचे पुर्वनियोजन करण्यात आले आहे. जिल्हाभरात स्वच्छतेचा जागर राबविला जाणार असून त्यात समाजातील सर्व घटकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यानुसार ही बैठक होत असून या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप उपस्थित राहतील. यावेळी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, गटसमन्वय उपस्थित राहणार आहे. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर सपाटे यांनी केले.

Web Title: Today, in the Zilla Parishad, Jagar is cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.