३० तलावांवर होणार आज पाणपक्षीगणना
By Admin | Updated: January 10, 2015 22:48 IST2015-01-10T22:48:43+5:302015-01-10T22:48:43+5:30
जंगल व नैसर्गिक वनसंपत्तीने समृद्ध भंडारा जिल्ह्यात स्थलांतरीत पक्ष्यांचे वास्तव्य आहे. या पक्ष्यांच्या अधिकृत नोंदी व्हाव्यात यासाठी उद्या रविवारला जिल्ह्यातील ३० तलावांवर पाणपक्षीगणना करण्यात

३० तलावांवर होणार आज पाणपक्षीगणना
भंडारा : जंगल व नैसर्गिक वनसंपत्तीने समृद्ध भंडारा जिल्ह्यात स्थलांतरीत पक्ष्यांचे वास्तव्य आहे. या पक्ष्यांच्या अधिकृत नोंदी व्हाव्यात यासाठी उद्या रविवारला जिल्ह्यातील ३० तलावांवर पाणपक्षीगणना करण्यात येत आहे. यापूर्वी २१ डिसेंबरला पक्षीगणना करण्यात आली होती.
पाणपक्ष्याच्या संख्येत होत असलेली वाढ किंवा घट ही बाब आता वनविभागाने गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळेच राज्य वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी राज्यभरात पक्षी गणना करण्याचे आदेश काढले आहेत. त्यांच्या या आदेशानुसार आता वनविभागाला दरवर्षी पाण पक्षीगणना करणे बंधनकारक झाले आहे. यासाठी जिल्ह्यातील ३० तलावांची निवड करण्यात आली आहे. या तलावांवर सकाळी ६ ते ११ वाजता दरम्यान पक्षीगणना केली जाणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पक्षी व त्यांच्या हालचाली टिपता याव्या यासाठी कॅमेरे व दुर्बिनसुद्धा पुरविले जाणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)