आजपासून भाजपचे शिवार संवाद अभियान
By Admin | Updated: May 24, 2017 00:19 IST2017-05-24T00:19:53+5:302017-05-24T00:19:53+5:30
राज्य शासनाने मागील ३० महिन्यात यशस्वी केलेल्या विविध योजनांची माहिती तथा कामगिरी २४ मे पासून सुरू होत असलेल्या ...

आजपासून भाजपचे शिवार संवाद अभियान
पत्रपरिषद : अनिल सोले यांची माहिती
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : राज्य शासनाने मागील ३० महिन्यात यशस्वी केलेल्या विविध योजनांची माहिती तथा कामगिरी २४ मे पासून सुरू होत असलेल्या भाजपच्या शिवार संवाद अभियानांर्गत दिली जाणार आहे. या आशयाची माहिती मंगळवारी दुपारी ३ वाजता आयोजित पत्रपरिषदेत आ. अनिल सोले, आ.परिणय फुके तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष मो. तारिक कुरैशी यांनी दिली. शिवार संवाद अभियानांतर्गत खा. नाना पटोले, आ. चरण वाघमारे, रामचंद्र अवसरे, डॉ. परिणय फुके, बाळा काशीवार यासह अन्य पदाधिकारी गावागावात जावून शेतकऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. तसेच विविध योजनांची माहितीसह पं.दिनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी अंतर्गत मतदारांशी संपर्क साधणार आहे.