यंदाही पाेळा भरणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 05:00 IST2021-09-05T05:00:00+5:302021-09-05T05:00:49+5:30

श्रमाची प्रतिष्ठा जाेपासणारा हा सण हाेय. बैलांना सजवून ताेरणाखाली आणले जाते. तसेच बैलांची मिरवणूकही काढली जाते. प्रत्येक गावात पाेळा सण उत्साहात साजरा केला जाताे. मात्र गतवर्षी काेराेना संसर्गामुळे पाेळा भरविण्यात आला नाही. मात्र आता काेराेना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे यंदा पाेळा भरविण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना हाेती. मात्र जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी परिपत्रक काढून पाेळा भरविण्यावर प्रतिबंध घातला आहे.

This time too, the pay will not be paid | यंदाही पाेळा भरणार नाही

यंदाही पाेळा भरणार नाही

लाेकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : श्रमप्रतिष्ठेचा गाैरव करणारा पाेळा शेतकरी माेठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र गतवर्षी काेराेना संसर्गामुळे पाेळा भरविण्यात आला नव्हता. जिल्ह्यात आता काेराेना संसर्ग कमी झाल्याने तसेच सर्व व्यवहार सुरळीत असल्याने पाेळा भरविला जाईल, अशी शेतकऱ्यांना आशा हाेती. मात्र संभाव्य तिसऱ्या लाटेच्या भीतीने यंदाही माेठा व तान्हा पाेळा भरविण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी एका आदेशान्वये मनाई केली आहे. तसेच बैलांच्या मिरवणुकी काढण्यावरही प्रतिबंध घातला आहे. पाेळा आणि इतर धार्मिक कार्यक्रम घरीच साजरे करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. 
पाेळा हा कृषिप्रधान संस्कृती महत्त्वाचा सण मानला जाताे. श्रमाची प्रतिष्ठा जाेपासणारा हा सण हाेय. बैलांना सजवून ताेरणाखाली आणले जाते. तसेच बैलांची मिरवणूकही काढली जाते. प्रत्येक गावात पाेळा सण उत्साहात साजरा केला जाताे. मात्र गतवर्षी काेराेना संसर्गामुळे पाेळा भरविण्यात आला नाही. मात्र आता काेराेना संसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे यंदा पाेळा भरविण्यास परवानगी मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना हाेती. मात्र जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी परिपत्रक काढून पाेळा भरविण्यावर प्रतिबंध घातला आहे.
माेठा व तान्हा पाेळा सण सार्वजिनकरीत्या भरविण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. बैलाची पूजा व अन्य धार्मिक कार्यक्रम घरीच करण्याचे आवाहन केले आहे. पाेळ्यानिमित्त बैलाच्या मिरवणुकी काढण्यावरही प्रतिबंध आणण्यात आले आहे. आरती, पूजा व अन्य धार्मिक कार्यक्रम आयाेजित करताना गर्दी हाेणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बैलाची पूजा करताना काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे निर्देश देण्यात आले आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई
- पाेळा सणानिमित्त जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती व समूहावर साथराेगप्रतिबंधक १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, तसेच भारतीय दंड संहिता १८६०च्या कलमान्वये कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहे.

तिसऱ्या लाटेची भीती कायम
राज्यात काेविड टास्क फाेर्सने काेराेना महामारीच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली आहे. भंडारासह राज्यातील काही भागात काेराेना टेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आले आहे. ब्रेक द चेनअंतर्गत व्यवहारास मुभा देण्यात आली असली तरी सणउत्सवात हाेणारी गर्दी तिसऱ्या लाटेस कारणीभूत ठरण्याची भीती आहे. त्यामुळे यंदा पाेळा सण सार्वजनिकरीत्या साजरा करण्यास मनाई करण्यात आली आहे.

 

Web Title: This time too, the pay will not be paid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.