ताटवाटीच्या घंटानादानंतर मुख्यमंत्र्यांनी दिला वेळ
By Admin | Updated: August 17, 2015 00:26 IST2015-08-17T00:26:00+5:302015-08-17T00:26:00+5:30
गोसीखुर्द वाही वसाहत विश्रामगृहात आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचले परंतू प्रकल्पग्रस्तांना भेट देण्याचे टाळत होते.

ताटवाटीच्या घंटानादानंतर मुख्यमंत्र्यांनी दिला वेळ
अशोक पारधी पवनी
गोसीखुर्द वाही वसाहत विश्रामगृहात आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहचले परंतू प्रकल्पग्रस्तांना भेट देण्याचे टाळत होते. दरम्यान गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त शेतकरी, शेतमजूर व मच्छिमार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांनी विश्राम गृहासमोरील रस्त्याचे बाजूला ताट-वाटी घंटानाद सुरु केला. अखेर दीड तासानंतर त्याच्या शिष्टमंडळास भेटीसाठी बोलाविण्यात आले.
प्रकल्पात राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिल्यामुळे राष्ट्रीय पुनर्वसन धोरणाप्रमाणे प्रकल्प बाधीतांचे दर्जेदार पुनर्वसन करण्यात यावे. प्रकल्पबाधीत व्यक्तीला नोकरी ऐवजी रुपये पाच लाख देण्यात यावे. वाढीव स्वतंत्र कुटुंबांना भुखंड व पॅकेजचा संपूर्ण लाभ देण्यात यावा. धरणामुळे तयार झालेल्या जलाशयात कायम स्वरुपी मासेमारीचे अधिकार प्रकल्पबाधीतांना देण्यात यावे. पर्यायी शेतजमीन बाजार भावाप्रमाणे किंमत देण्यात यावी. कलम चार अंतर बांधलेल्या विहिरींचे मोबदले विना अट त्वरित देण्यात यावे. याशिवाय नागरी सुविधा व रोजगार निर्मिती करण्यात यावी अशा प्रकल्पग्रस्तांंच्या मागण्या होत्या.