Tight waist for plastic release | प्लास्टिकमुक्तीसाठी कसली कंबर
प्लास्टिकमुक्तीसाठी कसली कंबर

ठळक मुद्दे२५ हजार कापडी पिशव्या वितरण : ‘एकच नारा, प्लास्टिकला नाही थारा’, भंडारा नगरपरिषदेचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : पर्यावरणासाठी अत्यंत घातक, मुक्या प्राण्यांच्या जीवावर बेतणाऱ्या तसेच प्लास्टिकचा पुनर्वापर शक्य नसल्याने रोजच्या वापरातल्या प्लास्टिक पिशव्या बंद करून पुनर्वापर करता येऊ शकणाºया कापडी पिशव्यांचा वापर वाढण्यासाठी भंडारा नगरपरिषद येथे प्लास्टिकमुक्त भंडारा शहर जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यशाळेसाठी व्यासपीठावर नगराध्यक्ष तथा खासदार सुनील मेंढे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे राठोड, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, स्वच्छता विभागाचे अभियंता नागेश कपाटे, कवलजितसिंग चड्डा तसेच शहरातील व्यापारी उपस्थित होते.
यावेळी स्वच्छता ही सेवा २०१९ अंतर्गत प्लास्टिकबंदीची मोहीम सुरू करण्यात आली असून नगरसेवक, कर्मचारी, व्यापारी, दुकानदार, नागरिक यांच्या सहकार्यातूनच ही मोहीम यशस्वी होवू शकते, असे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे यांनी सांगितले. त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष मार्गदर्शक यांनी प्लॅस्टिकला पर्यायी असणाºया कापडी बॅगा प्रत्यक्ष दाखवून त्याचे उपस्थितांना फायदे समजावून सांगितले. तसेच व्यापारी, दुकानदारांच्या प्लॅस्टिकच बाबतच्या विविध प्रश्नांचे निरसण केले.
त्यानंतर अभियंता नागेश कपाटे यांनी प्लॅस्टिकच्या दुष्परिणामांची माहिती सांगून शहरातील २५ हजार प्रॉपर्टीधारकांना कापडी पिशव्या वितरित करणार असल्याचे सांगितले.
सदर कार्यशाळेस नगरपरिषदेचे मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे, नगराध्यक्ष सुनील मेंढे, उपाध्यक्ष आशिष गोंडाणे, अभियंता नागेश कपाटे, नगरसेवक चंद्रशेखर रोकडे, संजय कुंभलकर, विनयमोहन पशिने, रजनिश मिश्रा, कैलास तांडेकर, नितीन धकाते, कवलजितसिंग चडा, बाबूराव बागडे, शमीम शेख, मकसूद खान, नगरसेविका आशा उईके, वनिता कुथे, गीता सिडाम, साधना त्रिवेदी, चंद्रकला भोपे, जुमाला बोरकर, मधुरा मदनकर, व्यापारी मयूर बिसेन, शाम खुराना तसेच इतर व्यापारी, नागरिक उपस्थित होते.संचालन अभियंता नागेश कपाटे यांनी तर प्रकल्प व्यवस्थापक प्रवीण पडोळे यांनी आभार मानले. कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी गणेश मुळे, स्वास्थ निरीक्षक दिनेश भावसागर, बांते, शेंदरे यांनी परिश्रम घेतले.


Web Title: Tight waist for plastic release
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.