पांगळी परिसरात वाघ-बिबट्याचा वावर

By Admin | Updated: May 4, 2016 01:21 IST2016-05-04T01:21:10+5:302016-05-04T01:21:10+5:30

नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या पांगळी तलाव परिसरातील गट क्रमांक ३२४ मध्ये मंगळवारला वाघासह बिबट्याच्या

Tigers and leopards in the lunatic area | पांगळी परिसरात वाघ-बिबट्याचा वावर

पांगळी परिसरात वाघ-बिबट्याचा वावर

मचाणीसह सीसीटीव्ही कॅमेरे लावले : मंगळवारी वनपरिक्षेत्राधिकाऱ्यांनी केली पाहणी
तुमसर : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या पांगळी तलाव परिसरातील गट क्रमांक ३२४ मध्ये मंगळवारला वाघासह बिबट्याच्या पायाचे ठसे आढळून आले. पांगळीचे तलाव जंगलात असून या तलावात एक ते दीड टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मे महिन्याच्या उन्हाळ्यात पाणी शिल्लक राहणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाण्यात विषारी पदार्थाचा शिकारी टोळीकडून घातपात होऊ नये, यासाठी मचान तयार करून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून वन्यप्राण्यांवर लक्ष ठेवले जात आहे.
मंगळवारला संरक्षित जंगलातील पांगळी जंगलात तलावात गटक्रमांक ३२८ मध्ये वाघ व बिबट्याच्या पायाचे ठसे वनअधिकाऱ्यांना आढळून आले. नाकाडोंगरीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एम.एन. माकडे, बीटरक्षक एन.जी. श्रीरामे, जे.डी. हटवार यांनी या ठशांची पाहणी केली. या परिसरात वन्यप्राण्यांकरिता एकमेव नैसर्गिक पाणवठा आहे. अडीच हेक्टर परिसरात हा तलाव विस्तारलेला आहे.
गट क्रमांक ३२८ नंतर पुढे बाबाची मळी कांद्री वनपरिक्षेत्रातंर्गत लहान तलाव आहे. या दोन्ही वनपरिक्षेत्रात वाघ व बिबट फिरत असतो अशी माहिती एम.एन. माकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. याशिवाय तलावाच्या काठावर मोर, हरीण या वन्यप्राण्यांचे ठसे दिसून आले. पाण्याच्या शोधात वन्यप्राणी या तलावावर येतात. मंगळवारी मध्यरात्री तलावाच्या मचानावर निगराणी करणारे कंत्राटी मजूर सुरज बागडे व शैलेश मडावी यांना वन्यप्राणी सैरावैरा पळत असल्याचा आवाज आला. तेव्हा वाघ व बिबट तलावावर आले असावे, असे दोघांनी सांगितले. वाघ तथा बिबट येत असला तर अन्य वन्यप्राणी तिथून पळतात. त्यानंतर आम्ही सतर्क झाल्याचे त्यांनी सांगितले. पांगळी तलावातील पाणी सिंचनाकरिता देण्यात आले. परिणामी पाण्याची पातळी घटली. आता केवळ येथे एक ते दीड टक्केच पाणीसाठा आहे. सध्या या जंगलात तेंदूपत्ता संकलनामुळे जंगलात हस्तक्षेप वाढला आहे. (तालुका प्रतिनिधी)

तलावात पाणीसाठा अत्यल्प असल्याने तलावात विषारी द्रव्य टाकण्याची शक्यता वाढली आहे. अशावेळी शिकारी टोळी लक्ष देऊन असते. याकरिता मचाण तयार करण्यात आली असून सीसीटीव्ही कॅमेरासह या तलावावर निगराणी ठेवण्यात येत आहे.
-एम.एन. माकडे, वनपरिक्षेत्राधिकारी, नाकाडोंगरी.

Web Title: Tigers and leopards in the lunatic area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.