पवनारखारी परिसरात वाघाचे वास्तव्य
By Admin | Updated: November 10, 2014 22:38 IST2014-11-10T22:38:08+5:302014-11-10T22:38:08+5:30
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलाअंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक ३५९ मध्ये पवनारखारी गावाजवळ वाघाच्या पाऊलखुणा दिसून आल्या यामुळे या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने परिसरातील

पवनारखारी परिसरात वाघाचे वास्तव्य
तुमसर : नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातील राखीव जंगलाअंतर्गत येणाऱ्या कक्ष क्रमांक ३५९ मध्ये पवनारखारी गावाजवळ वाघाच्या पाऊलखुणा दिसून आल्या यामुळे या परिसरात वाघाचे अस्तित्व असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
पवनारखारी येथील चाचिरे यांच्या शेतात वाघाचे पाऊलखुणा दिसून आल्याने नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. यासोबतच वाघ व रानडुकरात झुंज झाल्याच्याही खूना असल्याची माहिती गावकऱ्यांनी दिली आहे. रविवारी रात्री गावाशेजारी रानडुकरांचा मोठ मोठ्याने आवाज ऐकायला मिळला.
ही माहिती गावकऱ्यांनी वनपरिक्षेत्राधिकारी राजेंद्र कुलकर्णी यांना दिली. ते वनकर्मचाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहचले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता वाघाचे पाऊलखून असल्याचे स्पष्ट केले. यानंतर कक्ष क्रमांक ३६९ मध्ये वनविभागाने पाच सेंटर ट्रॅप कॅमेरे लावले असून एक कॅमेरा राखीव ठेवला आहे.
वनकर्मचाऱ्यांचे तीन पथकम तैनात केले असून एका पथकात चार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मागील ४८ तासापासून वनपथक वाघाच्या मार्गावर आहे. यादरम्यान सातपुडा पर्वत रांगात पवनखारी गाव हे राखीव जंगल परिसरात आहेत. या गावात व जंगलव्याप्त परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
राखीव वनक्षेत्र जास्त आहे. परंतु वाघ दर्शनाने नागरिक भयभीत झाले आहे. वाघाच्या पाऊलखुनावरून तो लहान असल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती वनपरिक्षेत्राधिकारी कुलकर्णी यांनी दिली. सोमवारी दिवसभर पवनारखारी परिसरातील तीनही पथकम फिरले. परंतु वृत्त लिहिपर्यंत कॅमेरात वाघ ट्रॅप झाला नाही. येथे आधुनिक तंत्राचा वापर करण्यात येत आहे, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)